ब्राह्मण सभेतर्फे कार्यक्रम

ब्राह्मण सभेतर्फे कार्यक्रम
Published on

ब्राह्मण समाजातर्फे
रविवारी विविध कार्यक्रम
कोल्हापूर ः ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाजातर्फे रविवारी (ता. १९) भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. न्यू महाव्दार रोड येथील पेटाळा क्रीडांगणावर हा सोहळा होईल.
सायंकाळी चार वाजता शोभायात्रेद्वारे पालखी मिरवणूक होईल. मिरवणुकीत प्रबोधनपर संदेश देणारे फलक, आकर्षक जिवंत देखावे असतील. मिरवणूक पेटाळा येथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, तटाकडीलमार्गे निवृत्ती चौक येथे पोहोचेल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुन्हा पेटाळा येथे परत येईल. यानंतर पाळणा व आरती होईल. त्यानंतर इंद्रनील बंकापुरे यांचा ‘मंदिराच्या देशा’ हा दृकश्राव्य कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com