

37789
गडहिंग्लज ः उद्यानांतील दुरवस्थेप्रश्नी देवानंद ढेकळे यांना अवजड वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
----------------------------------------------
उद्यानांतील खेळण्यांची दुरुस्ती करा
गडहिंग्लजमध्ये वाहतूक सेनेची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ ः शहरातील सार्वजनिक उद्यानांची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देऊन तातडीने उद्यानांतील विविध खेळांच्या साहित्याची दुरुस्ती व स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेने केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. काही दिवसांतच शाळांना सुट्या पडणार आहेत. त्यामुळे उद्यानांत खेळण्यासाठी मुलांची गर्दी होणार आहे. परंतु उद्यानांतील खेळणी तुटलेली आहेत. उद्यानांतील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि बसण्याची सोय अपुरी आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे. उद्यानांतील सर्व खेळांच्या साहित्याची दुरुस्ती व्हावी, सौंदर्यीकरण वाढवावे, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था करावी, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या केल्या आहेत. तालुकाध्यक्ष पंकज चौगुले, शहराध्यक्ष महेश भोसले, मारुती थोपटे, दिगंबर पाटील, विलास यमाटे, संभाजी येडूरकर, तुकाराम वाघराळकर, कृष्णा कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.