क्षयरुग्णांना सकस आहार

क्षयरुग्णांना सकस आहार
Published on

निवडेत ‘निक्षय मित्र’
पोषण कीटचे वाटप

क्षयरुग्णांना सकस आहारातून दिलासा

गगनबावडा, ता. १६ : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे (ता. गगनबावडा) येथे आज ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांच्याहस्ते वाटप झाले.
नांदेकर म्हणाल्या, ‘‘क्षयरुग्णांना औषधोपचाराबरोबरच सकस आहाराची गरज आहे. पोषण आहारामुळे रुग्ण उपचार पूर्ण करून लवकर बरा होतो. ‘निक्षय मित्र’ उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन ‘क्षयमुक्त भारत’च्या ध्येयात हातभार लावावा.’’ राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शासनाकडून रुग्णांना मोफत निदान, उपचार व दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र, उपचार काळात अतिरिक्त पोषणाची गरज लक्षात घेता ‘निक्षय मित्र’ उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वांनी क्षयरोग निर्मूलनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार करावा. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील, पंचायत समिती सभापती छाया देसाई, सदस्य अमर कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चोकाककर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com