

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर ः वरणगे (ता. करवीर) येथील रोहित धनाजी जाधव (वय २७) याने नदीकाठावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी हा प्रकार घडला. नातेवाईकांनी त्याचा फास सोडवून सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
बेशिस्त रिक्षाचालकांना ७७ हजारांचा दंड
कोल्हापूर ः वाहतूक नियमांचे उल्लंघन, प्रवाशांसोबत उर्मट वर्तन, बेशिस्त रिक्षा थांबे अशा १५१ चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला. दिवसभरात अशा रिक्षा चालकांकडून ७७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शहराच्या मुख्य चौकांसह मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ही विशेष मोहीम घेण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, एकेरी मार्गाचे उल्लंघन, रिक्षा थांब्याव्यतिरिक्त कोठेही थांबून व्यवसाय, गणवेश परिधान न करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.