

37998 सेजल सुतार
37997 सई यवलुस्कर
.........
कोल्हापूर संघ सुपर लीगसाठी पात्र
एमसीए महिला क्रिकेट स्पर्धा ः सई, सेजल, संजना चमकल्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या निमंत्रित वरिष्ठ महिला एकदिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने अहिल्यानगर महिला संघाचा दोन गडी राखून पराभव केला. स्पर्धेत कोल्हापूर संघ पाच सामने जिंकून सुपर लीगसाठी पात्र ठरला.
पुणे-वाघोलीतील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात अहिल्यानगर महिला संघाने फलंदाजी करताना ३० षटके ५ चेंडूंत सर्वबाद १६३ धावा केल्या. यात श्रेया घोडकेने ५९, ग्रिशा कटारियाने ५१, आकांक्षा बोरुडेने २४ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा महिला संघाकडून भेदक गोलंदाजी करताना सई यवलुस्करने पाच, तर सेजल सुतारने तीन, मधुरा इंगवलेने एक गडी बाद केला.
उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर महिला संघाने हे आव्हान ४० षटके १ चेंडूत ८ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यामध्ये संजना वाघमोडेने ३९, सुदीक्षा देसाईने २९, मुस्कान खटवाणीने २७, सेजल सुतारने २१, अंकिता भारतीने १४ धावांचे योगदान दिले. अहिल्यानगर संघाकडून गोलंदाज समृद्धी शिंदे, मिहेर नाझ यांनी प्रत्येकी तीन, तर श्रेया घोडके, आकांक्षा बोरुडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हा सामना कोल्हापूर जिल्हा महिला संघाने दोन गडी राखून जिंकला. या विजयामुळे कोल्हापूर संघ पाचही सामने जिंकत सुपर लीगसाठी पात्र ठरला. हे सामने सोलापूर जिल्हा महिला संघ, प्रेसिडेंट इलेव्हन महिला संघ व रिक्रिएशन महिला संघासोबत शनिवार (ता. १८) पासून पुण्यात सुरू होणार आहेत.
....
चौकट...
विजयी कोल्हापूर जिल्हा संघ
संजना वाघमोडे (कर्णधार), अंकिता भारती, अर्पिता नायकवडी, कार्तिकी चव्हाण, मधुरा इंगवले, मुस्कान खटवाणी, सई यवलुस्कर, साक्षी पोतदार, सेजल सुतार, सुदीक्षा देसाई, तनिष्का माळी, अभिलाषा पाटील, पूर्वा जाधव, वेदिका पाटील, स्वरा जाधव. संघ व्यवस्थापक सूरज जाधव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.