

38233
गडहिंग्लज : संयुक्त भीमनगरतर्फे डॉ. आंबेडकर जंयती मिरवणुकीत समाजसुधारकांच्या प्रतिमा लक्षवेधी ठरल्या. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------
संयुक्त भीमनगर मंडळातर्फे
गडहिंग्लजला आंबेडकर जयंती
गडहिंग्लज : येथील संयुक्त भीमनगर मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या ट्रॅक्टरवरील छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्र्वर महाराजांसह समाजसुधारक महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णा-भाऊ साठे यांच्या प्रतिमा लक्षवेधी ठरल्या. मिरवणुकीतील सहभागी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपस्थितांनी वंदन केले. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांच्या हस्ते म. दु. श्रेष्टी विद्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांनी स्वागत केले. मिरवणूक मार्गावरून शिवाजी रोड, शिवाजी बँक, टिळकपथ मार्गे दसरा चौकात आली. मिरवणूक वीरशैव बँक चौक, शिवाजी रोड, टिळक पथमार्गे दसरा चौकात आली. लक्ष्मी मंदिर रोड, नेहरू चौक, शिवाजी चौकमार्गे भीमनगरात मिरवणुकीचा समारोप झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.