

38275
इचलकरंजी : आमदार राहुल आवाडे यांनी पद्मजा यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
आयजीएमच्या कर्मचाऱ्याकडून
सापडलेला दागिना परत
इचलकरंजी, ता. १९ : सोन्याचे दर आकाशाला भिडत असताना हाताशी आलेला ५० हजारांचा सोन्याचा दागिना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचारी पद्मजा प्रकाश कुरुंदवाडे यांनी प्रामाणिकपणे संबंधिताना परत केला.
साफसफाईच्या कामादरम्यान रुग्णालय परिसरात पद्मजा यांना दागिना आढळला. त्यांनी तो तत्काळ रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला. रुग्णालय प्रशासनानेही मालकाचा शोध सुरू केला. रुग्ण व नातेवाइकांची चौकशी करता हा दागिना रुकडी येथील करिष्मा इम्रान पटेल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. योग्य पडताळणीनंतर दागिना त्यांच्या हाती दिला. पद्मजा यांच्या निःस्वार्थ प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांकडून पद्मजा यांचे कौतुक होत आहे. पद्मजासारख्या प्रामाणिक आणि जबाबदार माणसांचीच आज समाजाला खरी गरज आहे. अशी भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.