इचल : महापालिका डबल पट्टा

इचल : महापालिका डबल पट्टा
Published on

इचलकरंजी महापालिकेत
बसवेश्वर जयंती
इचलकरंजी ः येथील महापालिकेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कौन्सील हाॅलमध्ये करण्यात आले. यावेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

कुत्र्यांची निर्बीजीकरण निविदा रद्द
इचलकरंजी ः येथील महापालिकेतर्फे काढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्याच्या कामाची निविदा रद्द केली आहे. वर्षभरात सुमारे पाच हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या पशुशल्य चिकित्सा विभागाकडून निविदा काढली होती. तांत्रिक कारणामुळे ही निविदा रद्द केली असून, महासभेच्या मंजुरीनंतर पुन्हा या कामाची निविदा काढणार असल्याचे सभागृहाकडून सांगण्यात आले.
--------

38303
इचलकरंजी ः विद्युत रोषणाईमुळे तीन बत्ती चौकाला झळाळी आली आहे.

विद्युत रोषणाईमुळे
तीन बत्ती चौकाला झळाळी
इचलकरंजी ः शहरातील तीन बत्ती चौकाचे सुशोभीकरण केले असून, विद्युतीकरणामुळे या चौकाला नवी झळाळी मिळाली आहे. लोकसहभागातून सुशोभीकरण केले. नगरसेवक अभिषेक वाळवेकर यांच्या स्वखर्चाने चौकाची रंगरंगोटी, स्वच्छता व आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. हा चौक अधिक आकर्षक बनला आहे. नागरिकांच्या विशेष सहकार्यातून घडलेला हा एक विकासाचा आदर्श असल्याचे नगरसेवक वाळवेकर यांनी सांगितले. वर्दळीचा हा चौक आहे. पण, योग्य सुशोभीकरण न झाल्यामुळे या चौकाला भकासपणा निर्माण झाला होता. पण, हा चौक परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com