

हलकर्णीत नऊ वर्षानी लक्ष्मी यात्रा
नूल ः हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मीची देवीची यात्रा नऊ वर्षांनी २१ ते २५ एप्रिल अखेर होत आहे. यात्रा समितीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह शर्यती होणार आहेत, अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर हत्तरकी आणि उपाध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी दिली. मंदिर आणि देवीच्या स्थापनेला चारशे वर्षांची परंपरा आहे. हलकर्णीसह महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. यात्रेकरूंची गैरसोय होऊ नाही नये याची दक्षता ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने घेतली आहे. शांततेत यात्रा होण्यासाठी अध्यक्ष हत्तरकी, उपाध्यक्ष व्हसकोटी, सरपंच योगिता संगाज व उपसरपंच सलीम यमकनमर्डी व सदस्य नियोजनात आहेत. २१ एप्रिलला परमपूज्य सिद्ध सोमेश्वर महास्वामीजी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण, देवीची ओटी भरण्यात येईल. सकाळी नऊला नैवेद्य होईल. रात्री हकदार कुटुंबांनी ओटी भरल्यानंतर लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम होईल. यात्रा काळात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.