जीवघेणी वीज, स्वतःला सांभाळा नीट...!

जीवघेणी वीज, स्वतःला सांभाळा नीट...!
Published on

38593
---------------------------
जीवघेणी वीज, स्वतःला सांभाळा नीट...!

प्रबोधनाची गरज ः शाळा-महाविद्यालयांत मिळावेत संरक्षणाचे धडे

अशोक तोरस्कर ः सकाळ वृत्तसेवा
उत्तूर, ता. २० ः पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेवटी आकाशातून वीज पडण्याचा धोका जास्त असतो. ज्यावर्षी प्रचंड उन्हाळा असेल त्यावर्षी विजांची निर्मिती अधिक असते. आकाशातून पडणाऱ्या विजेला आपण रोखू शकत नाही. मात्र, खबरदारी घेऊन अटकाव करू शकतो. वीज पडणे किती धोक्याचे असते, यावर गावागावांत प्रबोधन आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांना विजेपासून संरक्षण कसे करावे, याबाबत धडेही द्यायला हवेत.
वीज म्हणजे ढगात असलेल्या धन व ऋण भारांची किमया असते. आकाशातील अनेक ढग वर-खाली होण्याच्या प्रक्रियेमुळे ढगातील हिमकण व जलकण फुटतात व विद्युत भार तयार होतो. यातूनच वीज कोसळण्याची घटना घडते. विजेचा प्रवाह जमिनीवर आल्यानंतर विद्युत वाहक असणाऱ्या माणसाकडे ती आकर्षित होते. त्यामुळे वीज पडलेल्या घटनांत अनेकांवर जायबंदी व मृत्यूची वेळ ओढवली आहे. पूर्वी ग्रामीण भागात घर बांधताना वीज पडून नुकसान होऊ नये म्हणून तिच्या वहनासाठी आधीच सोयीचा मार्ग तयार करून ठेवलेला असायचा. घरावर लोखंडी वेळा बांधून त्याला जोडलेली तार जमिनीत पुरलेली असे. अनेक ठिकाणी घराच्या पुढच्या अंगणात लोखंडी पार उभी करून ठेवलेली असते. कारण लोखंड हे विद्युतवाहक असल्यामुळे वीज लोखंडाकडे आकर्षित होते व घरावरील संकट टळते.
...............
चौकट...
* वीज चमकताना हे टाळा...
- मोबाईल, इंटरनेट वापरू नका
- संगणक, टीव्ही, दूरध्वनी बंद ठेवा
- धातूच्या वस्तूंसह बाहेर जाऊ नका
- पाण्यात असल्यास त्वरित बाहेर या
- झाडाखाली अजिबात थांबू नका
- उंच इमारतीच्या टेरेसवर जाऊ नये
..................
प्रतिक्रिया...
वीज पडणे ही नैसर्गिक आपत्ती मानली जाते. वीज पडून मरण पावल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकड्न चार लाख रुपये मदत केली जाते. ६० टक्क्यांपर्यंत अपंगत्व आल्यास ७४ हजार व त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखांची मदतीची तरतूद शासनाने केली आहे.
- एकनाथ मिसाळ, ग्राम महसूल अधिकारी
-------------------------
विजेपासून बचावासाठी पावसात उंच इमारतीवर किंवा झाडाच्या बाजूला उभे राहू नये. शेतात तारेच्या कुंपनाजवळ थांबू नका. विजांचा कडकडाट सुरू झाल्यावर सुरक्षित निवारा नसेल तर डोक्यावर घोंगडे पांघरून उभे राहावे. वीज चमकताना सावध राहणे व धोक्‍यापासून शक्‍य तितके दूर जाणे, हाच पर्याय आहे.
- प्रा. अतुल देशपांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com