गडहिंग्लज आगारास नवीन बसेस देण्याची शिंदे शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज आगारास नवीन बसेस देण्याची शिंदे शिवसेनेची मागणी
Published on

38762
कोल्हापूर ः गडहिंग्लज आगाराला नवीन बसेस देण्याच्या मागणीचे पत्र प्रताप सरनाईक यांना देताना संजय संकपाळ. शेजारी चंद्रदीप नरके, ऋतुराज क्षीरसागर आदी.
------------------------
गडहिंग्लज आगारास नवीन बसेस
देण्याची शिंदे शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज, ता. २१ ः जिल्ह्यातील प्रमुख शहर म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. येथील बसस्थानकात प्रवासी संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील आगाराला तातडीने नव्या बसेस द्याव्यात, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात दत्ता कोरवी, अमोल नार्वेकर, नागराज कोरवी, शहर संघटक काशीनाथ गडकरी यांचा समावेश होता. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, चंद्रदीप नरके उपस्थित होते. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गारगोटीसह कर्नाटक सीमाभागातील नागरिकांचा रोज गडहिंग्लजशी संपर्क असतो. वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून पुढे आलेल्या गडहिंग्लजला विशेष महत्त्व आले आहे. ग्रामीण भागात एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द होतात. विचारणा केली तर बसची संख्या अपुरी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगाराला नवीन बसेस द्याव्यात. तसेच मालवाहतूक वाहनधारकांना पासिंगसाठी कोल्हापूर गाठावे लागते. त्यामुळे वेळ, पैशाचा खर्च होत आहे. त्यामुळे तीन तालुक्यांसाठी गडहिंग्लजला मध्यवर्ती ठिकाणी पासिंगची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com