इचल : टुडे पान दोनसाठी

इचल : टुडे पान दोनसाठी
Published on

38965
38966
इचलकरंजी ः येथील महापालिकेच्या मालकीची तीन मजली शाॅपिंग सेंटर इमारत दुसऱ्या छायाचित्रात जुनी नगरपालिका इमारत.
(अमर चिंदे ः सकाळ छायाचित्र सेवा)

शाॅपिंग सेंटर, जुनी पालिका होणार नामशेष
दुरवस्थेमुळे वास्तू पाडणार; इचलकरंजीत उभारणार प्रशस्त व्यापारी संकुल
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २२ ः इचलकरंजी शहराच्या एकेकाळी वैभव असलेल्या शाॅपिंग सेंटरसह जुनी नगरपालिका इमारत पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत. अधिक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करण्यासाठी या दोन्ही ठिकाणी प्रशस्त असे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यावर महापालिकेच्या आगामी महासभेत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही इमारतींची दुरवस्था होत चालली आहे. विशेषतः शाॅपिंग सेंटर इमारतीतील असुविधा अभावी अनेक दुकान गाळे बंद आहेत.

तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती गडगंज असताना शहरात अनेक भव्य वास्तू उभारल्या. त्यात शाॅपिंग सेंटर व जुन्या नगरपालिका इमारतींचा समावेश आहे. स्टेशन रोडवर क्लस्टर इमारतीत नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यालय स्थलांतर झाले. त्यांनतर महात्मा गांधी पुतळ्याजवळील जुन्या नगरपालिका इमारतीला अवकळा आली. सध्या या इमारतीत पासपोर्ट कार्यालय, अपर तहसील कार्यालय आणि महापालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. या इमारतीला ५० वर्षे झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी नव्याने व्यापारी संकुल उभारणे प्रस्तावित आहे.
याशिवाय शंभूतीर्थ परिसरात शाॅपिंग सेंटरची तीन मजली इमारत आहे. यातील तळ मजल्यावरील गाळ्यात कापड दुकानांची रेलचेल आहे, पण तुलनेने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील अनेक दुकान गाळे रिकामे आहेत. पूर्वी सर्व गाळे भाड्याने दिले होते, पण अलीकडे या इमारतीला झालेली दुरवस्था, लिप्टची असुविधा, पार्किंगची गैरसोय या कारणांमुळे अनेकांनी वरील मजल्यावरील गाळे सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही इमारत ओस पडत आहे. तब्बल ५४ वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. ही इमारत पाडून त्या ठिकाणी भव्य असे व्यापारी संकुल उभारल्यास उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
---------
केवळ १९ लाख वार्षिक उत्पन्न
शाॅपिंग सेंटर इमारतीचे क्षेत्र तीन हजार चौरस मीटर आहे. महत्वाच्या ठिकाणी ही इमारत आहे, पण या इमारतीतून वर्षाला केवळ १९ लाखांचे उत्पन्न मिळते. ही इमारत पाडून नव्याने व्यापारी संकुल उभारल्यास महापालिकेला उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होते, असे जाणकारांचे मत आहे.
---------
निधीसाठी शासनाकडे प्रयत्न होणार
दोन्ही इमारती नव्याने बांधण्यासाठी शासन निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विशेषतः वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत. महासभेतील मंजुरीनंतर याबाबतच्या प्रक्रियेला गती येणार आहे. या दोन्ही इमारतीतील गाळेधारकांना नवीन इमारतीत प्राधान्याने गाळे देण्याचेही धोरण ठरविले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com