‘सेवासदन’तर्फे वसुंधरादिनी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

‘सेवासदन’तर्फे वसुंधरादिनी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन
Published on

39127
गडहिंग्लज ः सेवासदन नर्सिंगतर्फे वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी प्लास्टिक कचरा संकलन करण्यासह वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला.
-----------------------------------------
‘सेवासदन’तर्फे वसुंधरादिनी
प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ ः जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गडहिंग्लजमध्ये सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त पृथ्वी’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. विनोद बागीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वृक्षारोपण उपक्रमातूनही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींनी शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक कचरा संकलित केला.
विद्यार्थिनींनी परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि कॉलेज परिसरातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून नागरिकांना प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश दिला. ‘प्लास्टिकचा वापर कमी करा, पृथ्वीचे रक्षण करा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिक्षक व विद्यार्थिनींच्या हस्ते कॉलेज परिसरात वृक्षारोपण झाले. शिक्षकांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले. भावी पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरण राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com