आजऱा शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर

आजऱा शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर
Published on

39174
महादेव हेब्बाळकर, संभाजी तांबेकर
-----------------------------------
आजरा शेतकरी संघाच्या
अध्यक्षपदी हेब्बाळकर

उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर ः बिनविरोधी निवडी

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव ज्योतिबा हेब्बाळकर, तर उपाध्यक्षपदी संभाजी मारुती तांबेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक सुजयकुमार येजरे होते.
अध्यक्षपदासाठी हेब्बाळकर यांचे नाव महादेव पाटील यांनी सुचवले. त्याला विठ्ठलराव देसाई यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी तांबेकर यांचे नाव दौलती पाटील यांनी सुचवले. मधुकर कृष्णा देसाई यांनी अनुमोदन दिले. महादेव पाटील, अल्बर्ट डिसोजा, डी. ए. पाटील, एम. के. देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांची भाषणे झाली. सहाय्यक निंबधक येजरे, सुधीर देसाई, एम. के. देसाई यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. अध्यक्ष हेब्बाळकर, उपाध्यक्ष तांबेकर म्हणाले, ‘संघाचे माजी अध्यक्ष स्व. राजारामबापू देसाई यांनी हा संघ जोपासला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करणार आहे.’ ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, डाॅ. राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, उदयराज पवार, मधुकर यलगार, ज्ञानदेव पवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे आदी उपस्थित होते. गणपतराव सांगले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com