सरसकट सवलतीची साखर द्या ः शिंदे शिवसेना

सरसकट सवलतीची साखर द्या ः शिंदे शिवसेना
Published on

39229
गवसे ः येथील आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांना निवेदन देताना संजय पाटील, राजेंद्र सावंत व काकासाहेब देसाई आदी.
------------------------------------------
अ, ब वर्ग सभासदांना
सवलतीची साखर द्या

शिंदे शिवसेनेचे ‘आजरा’च्या कार्यकारी संचालकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः अ आणि ब वर्ग सभासदांना सरसकट सवलतीच्या दरात साखर द्यावी, अशी मागणी आजरा तालुका शिंदे शिवसेनेच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, २०२५-२६ मध्ये आजरा कारखान्याकडून सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू केली आहे. स्थापनेपासूनचे पाच ते सहा हजार शेअर्स रक्कम असणारे अ व ब वर्ग सभासद १७ हजार ४०८ आहेत. त्यांना साखर दिली णार नाही असे समजते आहे. त्याचबरोबर ५००० च्या आतील सभासद संख्या ६५८१ आहे. ६००० ते ७००० शेअर्स रक्कम असणारे सभासद १३४४ आहेत. हे सर्व आकडे एकत्र केले तर २५ हजार ३३८ सभासदांना आपल्याकडून सवलतीच्या दरात साखर दिली जात नाही.
सर्व सभासदांपैकी ९५ टक्के सभासद स्थापनेपासूनचे असून, आपण त्यांच्यावर साखर न देता अन्याय करत आहात. हे सभासद मतदान, वार्षिक सभेला चालतात, त्यांनी पिकवलेला ऊस गाळपासाठी चालतो, मग त्यांना सवलतीची दरातील साखर का दिली जात नाही? शासनाने कारखान्याला कर्जपुरवठा केला आहे, ते सभासद उत्पादकांचे हित जोपाण्यासाठीच. सर्व सभासदांना सवलतीच्या दरात सरसकट धोरण ठरवून ५० किलो साखर द्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, साखर सहसंचालकांना निवेदनाची प्रत दिली आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, उपतालुकाप्रमुख काकासाहेब देसाई यांच्यासह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com