

लोगो
गडहिंग्लज नगरपरिषद सभा
.............................................
काम पूर्ण होण्यापूर्वीच बिल कसे दिले?
स्वाती कोरींचा सवाल ः काम पूर्णत्वानंतरच बिल दिल्याचे खणगावेंचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ ः कडगाव रोडवरील वडाच्या झाडाचा पारकट्टा सुशोभीकरणप्रश्नी आंदोलनावेळी आरोप झाल्यानंतर सत्तारूढ राष्ट्रवादीने स्पष्टीकरण देताना कामाची एमबी दाखविली. ३ लाख ८५ हजारांचे काम असल्याचे सांगून बिल अदा केल्याचे सांगितले. परंतु, सुशोभीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच बिल कसे दिले, असा सवाल विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरी यांनी उपस्थित केला. त्यावर नगरसेवक बसवराज खणगावे यांनी काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतरच बिल दिले असून, विरोधकांनी माहिती न घेताच आरोप केल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ अध्यक्षस्थानी होते.
कोरी म्हणाल्या, ‘नगराध्यक्ष म्हणतात आम्ही पराभवाने वैफल्यग्रस्त झालो आहोत. मुळात मी विरोधी पक्षनेत्या म्हणून खूप आनंदी आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होण्याचा प्रश्नच येत नाही. ३ लाख ८५ हजारांच्या कामाचे १३ लाख ५२ हजारांचे इस्टिमेट कसे केले. हे चुकीचे आहे. नागरिकांचे पैसे असे वाया घालविणे निषेधार्ह आहे. या कामाचे सुधारित टेंडर काढण्याची तरतूद अकाउंट कोडमध्ये आहे; परंतु तसे घडलेले नाही.’
खणगावे म्हणाले, ‘काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. बांधकामाला पाणी मारले जात आहे. उर्वरित रक्कम छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आहे. त्याठिकाणी पुतळा उभारणे अडचणीचे असल्याने पर्यायी जागेवर पुतळा उभारणार आहे. विरोधकांनी आधी माहिती घ्यावी मगच आरोप करावेत.’ यावेळी पारकट्टा कामावरून कोरी व खणगावे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. नगराध्यक्षांनी हा विषय अजेंड्यावर नसल्याने पुढील विषय घेण्याची सूचना केली. उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह नगरसेवकांनी विविध विषयांवरील चर्चेत भाग घेतला. मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.
....................
चौकट...
* दृष्टिक्षेपात...
- खड्डेमुक्त शहर करण्याची रश्मीराज देसाईंची सूचना
- रस्त्यावरील चर तातडीने दुरुस्तीची अनिता खोत यांची मागणी
- दुकानगाळे भाडेवाढीचा प्रस्ताव देण्याची गुंड्या पाटील यांची सूचना
- प्रलंबित एक कोटीचा निधी आणल्याबद्दल गुंड्या पाटील यांचे अभिनंदन
- महालक्ष्मी मंदिराला निधी दिल्याबद्दल कोरींनी भाजप नेत्यांचे, तर नरेंद्र भद्रापूरांकडून शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांचे अभिनंदन
- प्रशासनाच्या धारणेवर पालिका चालत नसल्याचा कोरींचा मुख्याधिकाऱ्यांना टोला
- दिव्यांगांच्या निधीत सातत्याने घट थांबविण्याची कोरींची सूचना
- अधिकाधिक निधीद्वारे दिव्यांगांचे जगणे सुसह्य करा
...............
चौकट...
पाणीपुरवठ्यात प्रशासनाचे दुर्लक्ष
नव्या जलशुद्धिकरण केंद्राजवळ पाईपलाईन शिफ्टिंग व मुख्य जलवाहिनी नादुरुस्तमुळे शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा बंद आहे; परंतु प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन न केल्याने नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडल्याचे कोरींनी सांगितले. मुळात ही अडचण लक्षात घेऊन टॅंकरद्वारे पाणी देणे गरजेचे असताना कोणतीच कार्यवाही केली नसल्याकडे लक्ष वेधले. भद्रापूर व संतोष चिक्कोडे यांनी पालिकेकडे एकच टॅंकर असून, आणखीन दोन टॅंकर खरेदी करण्याची सूचना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.