होमिओपॅथीक कॉलेज

होमिओपॅथीक कॉलेज
Published on

-
होमिओपॅथिक, आयुर्वेदाचे
यंदा १०० जागांवर प्रवेश
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवात; केंद्र सरकारची मान्यता

शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : होमिओपॅथिक व आयुर्वेदिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून येथे प्रत्येकी १०० जागांसाठी प्रवेश सुरू होणार आहे. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे महाविद्यालयाच्या बांधकामाला गती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले शासकीय होमिओपॅथिक व आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी येथील होमिओपॅथिक व आयुर्वेदिक डॉक्टरांसह रुग्णांची होती. त्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न केले; तसेच केंद्र सरकारकडून शासनस्तरावर प्रस्ताव पाठवून आवश्यक तो पाठपुरावा केला व मान्यता आणली. प्रत्येकी २०० कोटींच्‍या निधीलाही मंजुरी आणली. त्यामुळे कोल्हापूर एकाच वेळी शासकीय होमिओपॅथिक व आयुर्वेदिक महाविद्यालय होणार आहेत.
यापूर्वी मुंबई, पुणे, दिल्ली, कर्नाटक अशा मोठ्या शहरात जाऊन होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षण बीएचएमएस, डीएचएमएस पदवी, बीएएमएस किंवा एमडी आयुर्वेद पदवी घेऊन कोल्हापुरात वैद्यकीय क्लिनिक उपचार करणारे डॉक्टर्स आहेत.
दोन्ही महाविद्यालय जागांवर सध्‍या बांधकाम सुरू आहे, तरीही वैद्यकीय अध्यापन वर्ग तातडीने सुरू करण्यासाठी डायएटची इमारत तसेच गैबी चौकातील एका खासगी जागा भाड्याने घेतली आहे. या दोन्ही ठिकाणी आयुर्वेद, होमिओपॅथिक असे दोन्ही शाखांचे अध्यापन प्रक्रिया स्वतंत्र सुरू होणार आहे. त्यासाठी एमडी (आयुर्वेद) एमडी होमिओपॅथिक पीएच.डी. तसेच संशोधन केलेले अनुभवी प्राध्यापक नियुक्त केले जात आहेत.

----
कोट
समाजातील दुर्बल घटकांतील गुणवत्ता यादीतील मुलांना शासकीय सवलतीत वैद्यकीय शिक्षणाची सोय होत आहे. नीट परीक्षा झाल्यानंतर पहिल्यांदा ॲलोपॅथीनंतर आयुर्वेद व होमिओपॅथीची प्रवेश प्रक्रिया होईल. जुलैमध्ये अध्ययन प्रक्रिया सुरू होईल.
- डॉ. अभिजित अहिरे, समन्वयक, वैद्यकीय महाविद्यालय
--
दृष्‍टिक्षेपात
केंद्र सरकारकडून अजूनही दोन वेळा सुविधांची पाहणी होणार
वैद्यकीय शिक्षण अध्यापनासोबत उपचाराच्या सुविधाही टप्प्याटप्प्याने होणार
भविष्यात होमिओपॅथिक व आयुर्वेदाचे रुग्णालयसुद्धा होणार
महाविद्यालय व रुग्णालयासाठी बांधकाम ही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com