

39514
गडहिंग्लज ः प्रशांत आंबी यांना धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमी उपस्थित होते.
..............................
प्रकाशक आंबींना धमकीप्रकरणी
गायकवाड यांच्या प्रतिमेचे दहन
गडहिंग्लज ः कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी धमकी देण्यासह अश्लील शिवीगाळ केली. त्याच्या निषेधार्थ येथील विविध सामाजिक संघटना व शिवप्रेमींनी गायकवाड यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर संघटनांच्या प्रतिनिधींनी हे आंदोलन केले. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार अब्दुलरौफ शेख यांच्याकडे सुपूर्द केले. सामाजिक शांतता व स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गायकवाड यांना तत्काळ अटक करावी. त्यांची आमदारकी रद्द करावी. पुन्हा त्यांना कोणत्याही निवडणुकीत उभे राहता येणार नाही, अशी कठोर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. बाळेश नाईक, पी. डी. पाटील, उज्ज्वला दळवी, आशपाक मकानदार, मौलाना अजीम पटेल, पी. एम. भोईटे, सुरेश पोवार, सिद्धार्थ बन्ने, सुरेश दास, अरविंद बारदेस्कर, आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.