

39674
कल्पक चिले राज्यात प्रथम
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत पाचगाव येथील कल्पक चिले यांनी कर सहायक आणि महसूल सहायक अशा दोन पदांवर यश मिळवले. विशेष म्हणजे कर सहायक परीक्षेत एनटी-‘ब’ प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. श्री. चिले यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल येथे झाले. त्यानंतर गणित विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद कॉलेज येथे झाले. शिवाजी विद्यापीठ येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०२४ मध्ये त्यांची सहायक प्राध्यापक पदावर निवड झाली होती. पाच वर्षांपासून ते शिवाजी विद्यापीठ परिसरात सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. या कालावधीत काही संधी थोडक्यात हातातून निसटल्या, तरीही धीर न खचू देता स्व-अभ्यासावर भर देत त्यांनी तयारी सुरू ठेवली. अखेर उल्लेखनीय यश मिळवले. मामा प्रकाश गवळी, आजी सोनाबाई गवळी, आई अर्चना आणि वडील अनिल यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.