

39797
गडहिंग्लज ः राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक शिक्षक.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत ‘जागृती’चे यश
गडहिंग्लज ः राज्य परीक्षा परिषदेतर्फे झालेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत येथील जागृती प्रशालेने यशाची परंपरा कायम ठेवली. शाळेचे तब्बल २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीप्राप्त ठरले असून, ११ लाख ५२ हजारांची शिष्यवृत्ती मिळविली. १६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत जागृती प्रशाला या परीक्षेत अग्रस्थानी राहिली. शिष्यवृत्तीप्राप्त केलेल्यांत ऋतुराज येसरे, श्रावणी बाळीकाई, पूर्वी रणदिवे, साक्षी देसाई, राघवेंद्र सुतार, सई पाटील, विनायक जंगली, अक्षता बागडी, जान्हवी राऊत, रोहिणी कट्टीकर, समर्थ पाटील, आर्या पाटील, अनघा श्रेष्ठी, तनिष्का शिंदे, अमेय देसाई, क्रांती सावरतकर, संग्राम यादव, संयोगिता गुंजकर, सोहम गंभीर, श्रावणी गोरूले, भक्ती मांगले, पार्थ चोथे, श्रृतिका पाटील, समीक्षा रेडेकर यांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, मुख्याध्यापक उमेश सावंत यांचे प्रोत्साहन तर श्वेता पुंडपळ, मनोहर भोये, सदानंद फुटाणे, आदींचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------------
39798
पृथ्वीराज बोरगावे
पृथ्वीराज बोरगावे राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी पृथ्वीराज बोरगावे हा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्तीस पात्र ठरला. त्याला ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्याला बळिराम पाटील व विश्वजित चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा नडगदल्ली, सचिव नानाप्पा माळगी, मुख्याध्यापक अरुण येसरे यांचे प्रोत्साहन लाभले.
.............................
‘घाळी’मध्ये उद्या प्लेसमेंट शिबिर
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात मंगळवारी (ता. २८) प्लेसमेंट शिबिर होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर होत आहे. कॉन्सिट्रिक फोर्ज, टी कॉग्रिशन, श्रीराम फायनान्स, ब्रेनसीटर इंडिया, चिकोडे बिल्डिंग मटेरियल, फुकोकू इंडिया, पीएसएन सप्लाय चेन, एलआयसी, साई सूर्य होंडा, रॉयल इन्फिल्ड, बजाज लाईफ इन्शुरन्स, टाटा मोटर्स, हुडाई, मारुती सुझुकी, चोलामंडल इन्व्हेस्टमेंट आदी कंपन्या सहभागी होणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. अभिजित इंगळे यांनी केले आहे.
...............................
संजय गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
चंदगड : नागनवाडी (ता. चंदगड ) येथील संजय गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून ३० विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ विद्यार्थी संजय गांधी विद्यालयाचे आहेत. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील ३२ पात्र विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी या शाळेचे आहेत.
इयत्ता आठवीतील यशस्वी विद्यार्थी : प्रथमेश लोहार (२६६), अनुष्का धुरी (२६२), मृण्मयी सुतार (२६२), अथर्व साळुंखे (२५८), भास्कर कुबल (२५६), अर्जुन मुंडे (२५४), आर्यन कदम (२५४), प्रणव माळी (२४६), ऋतुराज परीट (२४४), स्वरा पाटील (२४२), सोमनाथ पाटील (२४०), आदर्श गावडे (२३८), आदर्श सावंत (२३६), तनिष्क भामरे (२३०), वसुंधरा दळवी (२३०), माधवी पाटील (२२४), संदेश पाटील (२२२).
पाचवीतील यशस्वी विद्यार्थी : सत्यजित गावडे (२७०), नमिता आवडन (२६२), कादंबरी पाटील (२६०), मनस्वी रेडेकर (२५८), राजेश्वरी प्रधान (२५८), संज्योती कागणकर (२५४).
...............................
दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फेटा बांधणीचे धडे
चंदगड : येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या फेट्याच्या जतन व संवर्धनासाठी विशेष फेटा बांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. विक्रम बोकडे यांनी विद्यार्थ्यांना फेटा बांधण्याच्या कलेचे महत्त्व पटवून देत, ही कला प्रत्येकाने आत्मसात करावी असे आवाहन केले. कार्यशाळेत परिसरातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन संजय साबळे व शरद हदगल यांनी केले. यावेळी जे. जी. पाटील, टी. व्ही. खंडाळे, सुहास वर्पे, वैशाली पवार, भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते. शिबिरामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेचे महत्त्व समजले असून, संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
...................
5985
उत्तूर ः येथील ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करताना किरण आमणगी, सुनीता हातरगे, महेश करंबळी व सदस्य, सदस्या.
उत्तूर ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचा प्रारंभ
उत्तूर ः उत्तूर (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचा प्रारंभ सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक अवधूत येजरे, निखिल पावणे व पीयूष पुंडपळ यांनी उतूर ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार केली आहे. यासाठी त्यांना पाच महिन्यांचा कालावधी लागला. यावेळी सरपंच किरण आमणगी म्हणाले, ‘उत्तूर ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेले गाव आहे. १० हजार नागरिकांची सक्रिय लोकसंख्या आणि सहा प्रभागांमधून निवडलेल्या १७ सदस्य संख्येसह ही ग्रामपंचायत पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध आहे. ३० लाखांहून अधिक कर असलेल्या या गावासाठी तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या बळावर मूलभूत सुविधा आणि विकासाची गती वाढवत आहे. गावाला एका आधुनिक ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे.’ यावेळी उपसरपंच सुनीता हतिरगे, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, मिलिंद कोळेकर, संभाजी कुराडे, सनी आमणगी आदी उपस्थित होते भैरू कुंभार यांनी आभार मानले.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.