जनतेने दिलेल्या संधीचे सोन करा

जनतेने दिलेल्या संधीचे सोन करा
Published on

39816
पेद्रेवाडी ः येथे अनिरुद्ध रेडेकर यांचा सत्कार करताना मान्यवर. यावेळी अंजनाताई रेडेकर, यशोदा पोवार, समीर पारदे व अन्य मान्यवर.
-----------------------------------------------------------------
जनतेने दिलेल्या संधीचे सोन करा

अंजनाताई रेडेकर ः पेद्रेवाडीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सकाळ वृतसेवा
आजरा, ता. २६ ः ‘नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करावा. जनतेने दिलेल्या संधीचे सोन करावे,’ असे आवाहन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले.
पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. पेद्रेवाडी ग्रामस्थ, व्ही. के. चव्हाण-पाटील पतसंस्था, महात्मा फुले दूध संस्था, कमळाबाई रेडेकर दूध संस्था, केदारी रेडेकर हायस्कूल, केदारी रेडेकर वाचनालच यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
किरण पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, मुंबईच्या माजी नगरसेविका वत्सला जाधव यांचा सत्कार झाला.
अनिरुद्ध रेडेकर म्हणाले, ‘पेद्रेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारामुळे भारावून गेलो आहोत. या सत्कारामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. आपण टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नूल जिल्हा परिषद मतदारसंघाबरोबरच आजरा तालुक्याच्या विकासकामांमध्ये भरीव योगदान देणार आहे.’
समीर पारदे, युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन गाडे, शिवाजी गिलबिले, संजय येसादे, आनंदराव बुगडे, राजू पाटील, भाउसाहेब किल्लेदार, सुधीर पाटील, उत्तम होडगे, रवींद्र चव्हाण, धनाजी डोंगरे, बबन कातकर, रामचंद्र डोंगरे यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदधिकारी, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकरी उपस्थित होते. विश्वास येजरे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र पाटील यांनी आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com