गड- चौगुलेंचे यश

गड- चौगुलेंचे यश
Published on

39839
चित्री ः विद्या प्रसारक मंडळातर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ॲड. विकास पाटील, प्रशांत गंभीर, रमेश कुरुणकर आदी.

व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ
गडहिंग्लज ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथील विद्या प्रसारक मंडळातर्फे चित्री (ता. आजरा) येथे निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्‍घाटन झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक ॲड. विकास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आजरा अर्बन बँकेचे मुख्याधिकारी प्रशांत गंभीर व जनता एज्युकेशनचे सचिव रमेश कुरुणकर होते. शिबिरप्रमुख सचिन मगदूम यांनी स्वागत केले. ए. डी. कांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ॲड. विकास पाटील, रमेश कुरुणकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. संपत सावंत यांनी आभार मानले. बी. जी. कुंभार, प्रा. अनिल मगर, प्रवीण पाटील, शंकर खाडे, शिवाजी पाटील, संतोष देसाई, दत्ता लोहार, दयानंद ग्वाडी, विकास अतिग्रे, सुभाष तिप्पे, गुरलिंग खंदारे, वैशाली रेपाळ आदींनी नियोजन केले आहे.
................
39840
पंचाक्षर चौगुले

पंचाक्षर चौगुले यांचे सीएफपीमध्ये यश
गडहिंग्लज ः माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील पंचाक्षर प्रकाश चौगुले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्टिफाईड फायनान्सियल प्लॅनर (सीएफपी) ही पदवी संपादन केली. आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचा जागतिक मानदंड म्हणून ही पदवी ओळखली जाते. व्यावसायिकता, नैतिकता व तज्ज्ञतेची उच्चतम पातळी दर्शविणारी पदवी म्हणून सीएफपीला मान्यता आहे. भारतात केवळ ३५०० सीएफपी पदवीप्राप्त उमेदवार आहेत. चौगुले यांनी सेबीअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (एनआयएसएम) संस्थेचे विविध प्रमाणपत्रेही प्राप्त केली आहेत. ते बीबीए व एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कॉर्पोरेट, शासकीय कर्मचारी, शिक्षक, महिला मंडळे व उद्योजकांसाठी आर्थिक साक्षरतेवरील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणूनही ते कार्य करीत असतात.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com