आजरा ः मराठा महासंघाकडून निवेदन बातमी

आजरा ः मराठा महासंघाकडून निवेदन बातमी
Published on

39846
आजरा ः एसईबीसी प्रवर्गातील जागेबाबत चाैकशी व्हावी, या मागणीचे निवेदन विकास कोलते यांच्याकडे देताना मराठा महासंघाचे पदाधिकारी.
--------------------
एसईबीसी प्रवर्गातील
जागेबाबत चाैकशी व्हावी

मराठा महासंघाची मागणी ः केवळ ८०९ जागा; शिक्षण आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये अपेक्षित एसईबीसी प्रवर्गाला १,०५,८११ जागांपैकी केवळ ८०९ जागा आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण आयुक्त पुणे यांना देण्यात आले आहे.
आरटीई २०२६ च्या प्रवेशप्रक्रियेत प्रवर्गनिहाय आरक्षण नसले तरी दिव्यांग, आर्थिक दुर्बल व इतर घटकांना २५ टक्के जागा राखीव आहेत. १० एप्रिलला आरटीईचा ऑनलाईन निकाल प्रसिद्ध झाला. शिक्षणाचा अधिकार काय‌द्यानुसार खासगी शाळांमध्ये वंचित घटकांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असतात. परंतु प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सुधारित सूचनेमध्ये एससी, एसटी, व्हीआयएनटी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस व अनाथ बालके, दिव्यांग बालके यांचा समावेश असून तपशील दिला आहे. आरक्षणात एसईबीसी प्रवर्गाचा समावेश नसल्याने गोंधळ उडाला आहे. तथापि आरटीई प्रवेशप्रक्रिया पोर्टलवर उपरोक्त प्रवर्गासह एसईबीसीचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सुधारित सूचनेत एसईबीसी आरक्षण दर्शविले नसल्याने अनेकांनी ईडब्लूएस आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्यातील आरक्षण प्रवर्गाचा फायदा घेण्यासाठी एसईबीसी प्रवर्ग उपलब्ध असताना ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच ईएसबीसी प्रवर्गातून अर्ज किती आले व त्यापैकी किती जणांना प्रवेश मिळाले याची माहिती जाहीर करावी. पोर्टलवर आरक्षित जातींचा प्रवर्ग निवडल्यानंतर उत्पन्नाचा दाखला/उत्पन्न स्वीकारले जात नाही. याउलट सर्वसामान्यांसाठी एक लाखापर्यंतचा दाखला बंधनकारक आहे. याचा अर्थ आरटीईसाठी एकप्रकारे जात प्रवर्गनिहाय आरक्षण लागू आहे. निवेदनावर मराठा महासंघाच्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com