

39850
इचलकरंजी ः रामभाऊ राशिनकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. भूषण केळकर.
---
एआयमध्ये कौशल्य लावल्यास अनेक संधी
डॉ. भूषण केळकर ; रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमाला
सकाळवृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ ः जगातील अनेक देशात कृत्रीम बुद्धिमत्ता ही अतिजलद गतीने पसरत असून भारतात सुद्धा याचा प्रसार झाला आहे. एआयच्या वापरामुळे अनेकांच्या नोकऱ्यावर गंडातंर आले आहे. मात्र त्याच्या वापराबाबत कौशल्य पणाला लावले तर आपणास अनेक संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन डॉ. भूषण केळकर यांनी केले.
इचलकरंजीतील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यान मालेतील पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. `एआय संधी आणि आव्हाने` हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक दास होते.
डॉ. केळकर म्हणाले, एआय हे नवे तंत्रज्ञान भारतात येऊन पाच वर्षे झाली आहेत. या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार अशी सर्वत्र चर्चा आहे. हे खरे आहे. जगातील अनेक मोठमोठ्या कंपनीतील शेकडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे. पण एआय तंत्रज्ञान शिकणे सोपे आहे. त्याला विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी लागू आहे. आज सर्वच क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाने धुमाकूळ झाला आहे.
यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. प्रारंभी मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. यावेळी माधुरी केळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपमहापौर ॲड. अनिल डाळ्या आदी उपस्थित होते. ॲड. जवाहर छाबडा व राजेंद्र राशिनकर यांनी स्वागत केले. पंकज मेहता यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी वक्ते केळकर यांचा परिचय करून दिला.
-- चौकट
शेतीत मानवी श्रमाच गरज
शेतीत मानवी श्रम याचीच गरज आहे. उत्पादन वाढीसाठी काय करावे, हे सांगता येईल पण श्रमाला पर्याय नाही. ज्ञान मिळवण्यासाठी जबर इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. ते असेल तरच एआयच्या जगात मरण नाही. कारण हे क्षेत्र व्यापक आहे. याला पर्याय नाही. योग्य प्रकारे एआयवर संस्करण झाले तर त्याचा चांगला वापर होईल, असे डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले.