दाजीपूर

दाजीपूर
Published on

दाजीपूरमध्ये वन्यप्राण्यांच्या
प्रतिकृती बसविणार
राधानगरी : दाजीपूर अभयारण्यातील सुरंगी गेट समोरील आणि राज्य मार्गालगतच्या क्षेत्राचा पर्यटनदृष्ट्या विकासाचे काम वन्यजीव विभागाने हाती घेतले आहे. लवकरच अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना आकृष्ट करणाऱ्या नावीन्यपूर्ण स्थळाची भर पडणार आहे. या स्थळावर जांभा दगडाच्या वापरातून चौथरा उभारणी करून, अभयारण्यक्षेत्रात आढळणाऱ्या आणि वावर असणाऱ्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती बसविणार आहेत. प्रस्तावित योजनेसाठी निसर्ग पर्यटनांतर्गत २५ लाख निधीची तरतूद झाली आहे. यापूर्वी विस्तारित वन्यजीव अभयारण्याची हद्द सुरू होते. त्या मांजरखिंडीत अभयारण्याचे प्रतीक असणाऱ्या गव्यारेड्याची शिल्पाकृती उभारली आहे. त्यातून ‘मांजरी खिंड’ हे स्थळ पर्यटकांसाठी हक्काचा थांबा आणि विशेष ‘सेल्फी पॉईंट’ बनले आहे. त्याच धर्तीवर सुरंगी गेटसमोर आता पर्यटकांना अभयारण्यातील इतर वन्यप्राण्यांच्या शिल्पाकृती नजरेस पडणार आहेत. पर्यटकांसाठी नवा थांबा आणि सेल्फी पॉईंट निर्माण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com