गड- संक्षिप्त

गड- संक्षिप्त
Published on

40171
गडहिंग्लज ः प्रभाग दहामधील कार्यक्रमात मृणालिनी पेडणेकर यांचा सत्कार आरती देवगोंडा यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

गडहिंग्लजमध्ये महिला आरोग्य मेळावा
गडहिंग्लज ः येथील प्रभाग १० मध्ये लायन्स ब्लड बँकेत नगरसेविका आरती देवगोंडा यांच्या पुढाकाराने आणि वुई आर मोअर संस्थेच्या माध्यमातून विशेष महिला आरोग्य मेळावा उत्साहात झाला. आरोग्य जनजागृतीसह प्रभागाच्या विकासकामांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आरोग्य मेळाव्यात तज्ज्ञ मार्गदर्शक मृणालिनी पेडणेकर व ज्योत्स्ना नार्वेकर यांनी महिलांच्या पीसीओडी, पीसीओएस, शुगर, बीपी, थायरॉईड, ॲलर्जी, दमा व स्त्री-आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले. खोत कॉलनी व राजगुरूनगरमधील तारिणी सखी मंचचे सहकार्य मिळाले. पल्लवी गुलानावर यांनी स्वागत केले. डॉ. शीतल बेळगुद्री यांनी प्रास्ताविक केले. सुमन पवार यांनी आभार मानले.
...........................
‘कित्तूरकर’मध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज ः येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात पोलिस, वन, राज्य राखीव दलात यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आराधना आरबोळे, अमोल घेजी, सचिन कांबळे, अस्मिता पाटील यांचा विशेष सत्कार झाला. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविल्याचे बंदी यांनी सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांना हे यश नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले. प्राचार्य उमेश सावंत, प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा. पुंडलिक रक्ताडे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. एस. आर. बाडकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली घुगरे यांनी आभार मानले.
----------------------------------
चैतन्य अपंगमती विद्यालयात खाऊ वाटप
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयातील मतिमंद मुलांसमवेत राज्ञी टेळे या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राज्ञीचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्त अपंगमती विकास विद्यालयातील मतिमंद मुला-मुलींना टी-शर्टस् वाटण्यात आले. तसेच खाऊचे वाटप केले. यावेळी विद्यालयाचे संस्थापक साताप्पा कांबळे, धैर्यशील पोवार, टेळे, के. बी. पोवार, सुनंदा टेळे, अनुराधा पोवार, प्रसार टेळे, धनश्री टेळे, किसन शेटके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------
प्राथमिक उपचार केंद्राचे आज ‘घाळी’त उद्‍घाटन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी कॉलेज माजी विद्यार्थी संघटना व केदारी रेडेकर धर्मादय रुग्णालयातर्फे महाविद्यालयात प्राथमिक उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. उद्या (ता. २९) सकाळी सव्वाआठ वाजता त्याचे उद्‍घाटन होणार आहे. रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे केले आहे.
...................
‘ओंकार’मध्ये सेवा हक्क जागृती उपक्रम
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ विभागातर्फे सेवा हक्क जागृती उपक्रम राबविण्यात आला. लोकसेवा हक्क दिनानिमित्त त्याचे नियोजन केले होते. प्रा. क्रांती शिवणे यांनी सेवा हक्क शपथ दिली. डॉ. काशीनाथ तनंगे यांनी सेवा हक्कांची माहिती दिली. शासनाने केलेल्या अधिनियमाचे आपण अवलोकन केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. डॉ. डी. एस. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. मुख्य लिपिक प्रकाश कांबळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रा. कविता पोळ यांनी आभार मानले.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com