

रंकाळा तलाव कायमचा
मुजवायचा आहे का?
हिंदू युवा प्रतिष्ठानचे प्रसिध्दीपत्रक
कोल्हापूर, ता. २८ ः ऐतिहासिक रंकाळा तलाव अस्तित्व हळूहळू गमावत असून, महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तलावात सांडपाणी मिसळत आहे. वारंवार तलावातील मासे व इतर जलचर मृत झाल्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेला हा तलाव कायमचा मुजवायचा आहे का?, असा आरोप हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई आणि रंकाळाप्रेमींनी पत्रकातून केला आहे, तसे प्रसिध्दीस दिले आहे.
तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने ठोस उपायोजना करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येक वेळी वेगळ्याच तंत्रज्ञानाची चर्चा होते आणि मूळ दुखणे बाजूलाच राहते. यापूर्वी अशा अनेक संकल्पना कुचकामी ठरल्या आहेत. २०२३ मध्ये अमृत योजनेच्या टप्पा दोनअंतर्गत सुमारे ११ कोटी ९९ लाखांचा आराखडा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हा आराखडा मंजूरही होऊन आला होता. त्याचे पुढे काय झाले?, हे गुलदस्त्यात आहे. श्याम सोसायटीच्या नाल्यातून १२ ते १४ लाख लिटर, देशमुख हॉल नाल्यातून चार ते पाच लाख लिटर, सरनाईक कॉलनी नाल्यातून सहा ते सात लाख लिटर व परताळ्याच्या नाल्यातून पाच ते सहा लाख लिटर सांडपाणी मिसळत असतानाही प्रशासन गप्पच असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.