

GAD42.JPG
41310
शिंदे अभियांत्रिकीमध्ये ''रोबो
फोर्ज एक्स सिरीज'' कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी व मेकॅट्रॉनिक्स विभागातर्फे ''रोबो फोर्ज एक्स सिरीज फोर्ज बेसिक्स १.०'' विषयावरील कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून सचिव स्वाती कोरी उपस्थित होत्या. सल्लागार महेश कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. व्ही घेवडे होते.
कार्यशाळेसाठी रोबोसॅप इनोव्हेशनचे कार्यकारी संचालक रोहित कदम यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ४० विद्यार्थ्यानी तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली. मॅन्युअल रोबोटची रचना, त्यातील घटकांची ओळख, गिअर मेकॅनिझम, चेसिस डिझाइन आणि असेंब्लीच प्रत्यक्ष अनुभव घेतला. मूलभूत प्रोग्रामिंग, सेन्सर्सचा वापर, मोटर कंट्रोल व कंट्रोल सिस्टीमची संकल्पनाही शिकविण्यात आली. विद्यार्थ्यांनी टीमवर्क, समस्या सोडविण्याची पद्धत, तसेच हार्डवेअर व सॉफ्टवेअर यांचा समन्वय कसा साधायचा हे कामातून आत्मसात केले. या उपक्रमामुळे तांत्रिक ज्ञान वाढण्यासह समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होऊन रोबोटिक्स व ऑटोमेशन क्षेत्राबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचे स्वाती कोरी यांनी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत केले. रोहित कदम यांनी मार्गदर्शन करून भविष्यातील संधींबाबत प्रेरणा दिली. उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष व तांत्रिक प्रगतीची प्रेरणा निर्माण झाल्याचे प्राचार्य डॉ. घेवडे यांनी सांगितले. प्रा. गुरुराज कुंभार यांनी नियोजन केले. प्रा. इम्रान पटेल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिरुद्ध भोई यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.