

रस्त्यावर पडणाऱ्या खडीमुळे
वाहनधारक झाले आक्रमक
खडीचे ट्रक रोखले; पोलिसांची मध्यस्थी, वाहतूक पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ ः वाटंगी- आजरा रस्त्यावर खडीचे वहातुक सुरू आहे. या ट्रकमधून खडी रस्त्यावर पडत असल्याने वाहने घसरत असून अपघात होत आहेत. त्याचबरोबर अवजड वाहनांमुळे रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. क्रशर ठेकेदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक आज आक्रमक झाले. त्यांनी वाटंगी रस्त्यावर खडीची वाहतूक करणारे ट्रक रोखले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मध्यस्ती केल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. याबाबत संबंधित ठेकेदाराने कार्यवाही न केल्यास भविष्यात वाहतून रोखण्याचा इशाराही वाहनधारक व वाटंगी ग्रामस्थांनी दिला.
वाटंगी रस्त्यावर क्रशर आहेत. येथून खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. वाहनांतून खडी थेट रस्त्यावर पडते. यामुळे रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने घसरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अवजड वाहनांमुळे रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. दोन-तीन दिवसांत वाहने घसरून चार-पाच जखमी झाल्याचे वाहनधारकांनी सांगितले. याबाबत बांधकाम प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून गांभीर्य दाखवले नाही. यामुळे संतापून वाटंगी ग्रामस्थ व वाहनधारकांनी खडीचे भरलेले ट्रक अडवले. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत वाहनधारकांची समजूत काढली. वाहतूक पूर्ववत केली. वाहनधारक व ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधित ठेकेदारांना बोलवून रस्ता सुरक्षित कऱण्याबाबत सूचना देणार असल्याचे सांगितले. याबाबत ठेकेदाराकडून कार्यवाही न झाल्यास भविष्यात रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थ व वहानधारकांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.