

कोळींद्रे, साळगावला
महालक्ष्मीदेवीची यात्रा सुरू
आजरा, ता. ४ ः आजरा तालुक्यातील कोळींद्रे व साळगाव येथे श्री. महालक्ष्मीदेवीची यात्रा पारंपारिक पध्दतीने व मोठ्या यात्रा होत आहे. यात्रेला आजपासून सुरवात होत आहे. मंगळवार (ता. ५) लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम आहे. तर बुधवार (ता. ६) यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेनिमित्त उत्साहाचे व चैतन्याचे वातावऱण आहे.
कोळींद्रे गावची २१ वर्षानंतर तर साळगावची १७ वर्षानंतर यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त घरांची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिराची सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमनी गावी परतला आहे. यात्रे निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर स्पर्धा व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोनही गावात इरडे पडले असून गावात चाक बंदी करण्यात आली आहे. यात्रा समितीच्यावतीने जय्यत तयारी केली असून वाहनाची पार्किंग व्यवस्थेबरोबर तात्पुरते वळण रस्तेही करण्यात आले आहेत. आरोग्य, पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. माहेरवाशीणी, पै- पाहुणे कोळींद्रे, साळगाव गावात दाखल होत आहेत. बऱ्याच वर्षांनी यात्रा होत असल्याने ग्रामस्थामधे उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. यात्रेनिमि्त्त मेवामिठाई, खेळण्याची दुकाने लागली आहेत. मनोरंजनाचे खेळ, पाळणेही बसवण्यात आलेले आहेत. दोनही गावात यात्रे निमित्त लगबग पहावयास मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.