AI गुरु: भविष्याचा नवा साथीदार — कौन्सिल ऑफ एज्युकेशनची यशस्वी एकदिवसीय कार्यशाळा

AI गुरु: भविष्याचा नवा साथीदार — कौन्सिल ऑफ एज्युकेशनची यशस्वी एकदिवसीय कार्यशाळा
Published on

‘कौन्सिल ऑफ एज्युकेशन’तर्फे
‘एआय गुरू’ कार्यशाळा
कोल्हापूर : ‘कौन्सिल ऑफ एज्युकेशन’तर्फे ‘एआय गुरू : भविष्याचा नवा साथीदार’ यावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेला प्रतिसाद मिळाला.
प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या काळातील गरज बनली असून, शिक्षण आणि विकासासाठी तिचा स्वीकार करावा लागेल,’ असे डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. यू. आर. पाटील, प्राचार्य डॉ. चिदानंद पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी आभार मानले. पहिल्या सत्रात सागर चव्हाण यांनी ‘एआय गुरू : स्मार्ट टीचिंग, स्मार्ट फ्युचर’ यावर मार्गदर्शन केले. प्रा. पूजा खापरे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. कबीर खराडे यांनी ‘एआय कनेक्ट : लर्न, लीड, ट्रान्स्फॉर्म’ यावर माहिती दिली. प्रा. बाबासाहेब कश्यप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पोतदार, प्रा. पोळ यांनी परिचय करून दिला. ओंकार मुगडे यांनी तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. अभिजित माने, अनिल कुंभार,अतुल कोठावळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com