

अल्पवयीन मुलीवर
मामे भावाकडून अत्याचार
गैरवर्तनाबद्दल वडील, मामाला अटक
कोल्हापूर, ता. ६ ः अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडितेशी तिच्या वडील आणि मामाने अश्लील वर्तन केले. गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा असा प्रकार घडला आहे, अशी फिर्याद पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा वडील आणि मामाला अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
जवळचे नातेवाईकच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असल्याचे प्रकार राज्यात विविध भागांत उघडकीस आले आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही नात्याला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी माहिती दिली, की जन्मदात्या वडिलाने व मामाने मुलीशी अश्लील वर्तन केले. मामाच्या मुलाने अत्याचार केला. गेल्या पाच वर्षांत असा प्रकार अनेक वेळा घडल्याने मुलीची आई मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती. अखेर मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर वडील व मामाला अटक केली. दोघांनाही बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.