

-लोगो - सकाळ संवाद
निरोगी आयुष्याचा मंत्र देणारा सोहळा!
‘सकाळ संवाद’मध्ये तज्ज्ञांचे मत; उद्यापासून ‘सकाळ आयुर्वेदिक एक्स्पो’
-
लीड
सर्वच स्तरांतील व्यक्तींना घरगुती उपायांपासून ते बहुअंगी उपचारांचे आयुर्वेद शास्र उपयुक्त ठरते. मात्र, योग्य माहितीअभावी अनेकांची कोंडी होते, अशा सर्वांनाच आयुर्वेदिक घरगुती औषधांपासून ते आयुर्वेदिक उपचारांची माहिती देणारे ‘सकाळ आयुर्वेदिक एक्स्पो’ प्रदर्शन येत्या ९ ते ११ मे या काळात व्ही. टी. पाटील सभागृहात होत आहे. त्यातून आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व समजून घेत जीवनशैलीत सुधारणा करता येणार आहे. त्यासोबत तंदुरुस्त व आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग समजून घेता येणार आहे.
-
42063
आयुर्वेदाची व्यापकता
घरगुती उपायांपासून
तंदुरुस्त आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैली अवलंबण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र, योग्य माहितीअभावी काहींना ते अशक्य होते. अशा स्थितीत भारतीय आयुर्वेदशास्र औषधांची मोठी परंपरा आहे. ‘सकाळ आयुर्वेदिक एक्स्पो’मुळे समाजातील सर्वच घटकांना आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेता येणार आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या अनेक वनस्पतींचा औषध म्हणून वापर होतो, त्या कोणत्या वनस्पती आहेत? त्यांची रचना व गुणधर्म समजून घेता येणार आहेत. त्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे आहे. तर विविध तज्ज्ञांकडून असंख्य औषधी वनस्पतींचा औषधाचा वापर कसा, कोठे, कधी करावा? कोणत्या स्वरूपात करावा? इथपासून ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधे घेणे महत्त्वाचे काय आहे?, अशा बाबी समजून घेता येणार आहेत, त्यासाठी हे प्रदर्शन मौलिक ठरणार आहे.
- संजय आपटे, मेसर्स वासुदेव कृष्णाजी आपटे.
-----------
42076
ऋतुचर्या, आहार
विहाराचे शास्रशुद्ध मार्गदर्शन
प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्यभरातील आयुर्वेद वनस्पतीपासून औषध बनविणाऱ्या कंपन्यांचे उत्पादक येथे येणार आहेत. त्यांच्याकडील बहुविध आजारांवर गुणकारी ठरणारी आयुर्वेदिक औषधे पाहता येणार आहेत. आपल्या भागात ठराविक शेती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात; मात्र काही शेतकरी शेती उत्पादन घेताना प्रयोग करू इच्छितात. अशा शेतकऱ्यांना आयुर्वेदिक वनस्पतींची लागवडही अर्थिक उत्पन्न मिळवून देण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन या प्रदर्शनातून मिळणार आहे. तर घरगुती स्तरावरही आजीबाईचा बटवा म्हणून काही आयुर्वेदिक औषधी घरच्या घरी घेऊन नियमित आजारातील लक्षणे कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आजीबाईच्या बटव्यातील कोणकोणत्या औषधी वनस्पती तसेच त्याच घटक पदार्थांचा समावेश आहे, हेही समजून घेता येणार आहे.
- आदिनाथ धोंगडी, संचालक, आयुर्वेद रीसेलर्स असोसिएशन
--
42065
आधुनिक जीवनशैलीत
आयुर्वेदाची अपरिहार्यता
विशेषतः कोरोना काळानंतर आपल्या आरोग्याबाबतची सजगता कमालीची वाढली असून, रासायनिक औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समाज आता आयुर्वेदाकडे एका आशेने पाहत आहे. आयुर्वेदाला हजारो वर्षांची महान परंपरा असून, कोट्यवधी लोकांनी त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवले आहेत. आपल्या आरोग्याची खरी सुरुवात ही घराच्या स्वयंपाकघरातून होते, हे आयुर्वेदानेच जगाला पटवून दिले. अगदी मधुमेहासारखे आजारही आयुर्वेदाने नियंत्रित होतात, हे आता सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षभरात २६ टक्के लोकांनी आयुर्वेदिक जीवनशैलीचा स्वीकार केला असून, १८६ देशांनी योगाचे महत्त्व मान्य केले आहे. हीच औषधे आणि आयुर्वेदिक दिनचर्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या ‘एक्स्पो’चे आयोजन केले आहे.
- शेखर खोले, राज्याध्यक्ष, आयुर्वेदिक रीसेलर्स असोसिएशन
--
42066
आरोग्याचा जागर
आणि नैसर्गिक जीवनशैली
आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून, ती जगण्याची एक समृद्ध कला आहे. ही पद्धती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि निरोगी आयुष्याचे गुपित त्यांना कळावे, हाच ‘सकाळ’ आयुर्वेदिक एक्स्पोचा मुख्य उद्देश आहे. या एक्स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ प्रदर्शन नसून, जनसेवेचा यज्ञ मांडला आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, सल्ला आणि औषधांचे वाटप केले जाणार आहे. सोबतच, मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक जीवनशैलीच्या माध्यमातून औषधांशिवाय आरोग्य कसे टिकवायचे, याचे मार्गदर्शन येथे मिळेल. शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी नैसर्गिक आहार आणि आयुर्वेदाची जोड आवश्यक असल्याने, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
- अचल हांजे (बावडेकर), जिल्हाध्यक्ष, आयुर्वेदिक रीसेलर्स असोसिएशन
--
42088
शरीर, मन आणि
आत्म्याचा त्रिवेणी संगम
आयुर्वेदिक रीसेलर्स असोसिएशनचे ‘आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार’ हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही कार्य करीत आहोत. सामान्यतः आजारी पडल्यावर आपण औषध म्हणून आयुर्वेदाकडे वळतो; परंतु निरोगी असतानाही दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद तितकाच मोलाचा आहे. ‘आयुर्वेद’ या शब्दाचा मूळ अर्थच ‘जीवनाचे विज्ञान’ असा आहे. निसर्गाशी नाते सांगणारा आहार आणि विहार अंगीकारला, तर आजार आपल्यापासून दूर राहतात. आयुर्वेदाचे सर्वांत मोठे बलस्थान म्हणजे ही पद्धती केवळ शरीरावर उपचार न करता शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधते. हाच दृष्टिकोन लोकांच्या मनात रुजविण्यासाठी आम्ही या ‘एक्स्पो’चे व्यासपीठ निर्माण केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आरोग्याकडे बघण्याची एक नवी आणि सकारात्मक दृष्टी कोल्हापूरकरांना मिळेल, याची खात्री आहे.
- ओंकार जोशी, खजिनदार, आयुर्वेदिक रीसेलर्स असोसिएशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.