अल्पवयीन अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावास

अल्पवयीन अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावास
Published on

42278

अल्पवयीन अत्याचारप्रकरणी
आरोपीला २० वर्षे कारावास
कोल्हापूर, ता. ८ ः आईला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सहा वर्षे अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले. दत्तात्रय बंडू गोरे (वय ५३, कात्यायनी, ता. करवीर) असे आरोपीचे नाव आहे. २० वर्षे सक्त कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा त्याला सुनावली.
अधिक माहिती अशी, पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आरोपी २०१३ पासून अत्याचार करीत होता. वेळोवेळी आईला ठार मारण्याची धमकी, स्वतःचे बरेवाईट करून घेण्याची भीती, व धमक्या देत जून २०१९ पर्यंत अत्याचार केले. याबाबत पीडितेने राधानगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. राधानगरी पोलिसांकडून तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सहायक सरकारी वकील प्रतिभा जाधव यांनी १४ साक्षीदार तपासले. ॲड. जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com