गड-मुश्रीफ कार्यक्रम

गड-मुश्रीफ कार्यक्रम
Published on

gad91.jpg

42365

विकासात अडथळा चांगला नाही
हसन मुश्रीफ : गडहिंग्लजला विरंगुळा पार्कच्या कामाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ९ : ‘‘नगरीच्या विकासात भर घालण्यासाठी एखादा ट्रस्ट पुढे येतो. निधी उपलब्ध केला जातो. पण, तीन-तीन वर्षे त्यांना ठराव दिला जात नाही. विकासकामात अशा गोष्टी चांगल्या नाहीत,’’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासक काळातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
येथील पालिकेतर्फे जनकल्याण ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यातून साकारणाऱ्या कुमारसाहेब मोहिते विरंगुळा पार्कच्या कामाचा प्रारंभ, सरस्वती नगरातील सोलर संचाचे उद्घाटन, हरित शहर उपक्रमांतर्गत वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. मुश्रीफ बोलत होते. जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद हळबे अध्यक्षस्थानी होते. विद्यानगरमध्ये हा कार्यक्रम झाला. श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘अल निनोचा प्रभाव जाणवत आहे. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. मंत्रिमंडळाच्या दर बैठकीत पाणी साठ्याचा आढावा घेतला जात आहे. विरंगुळा पार्कच्या कामात नगरसेवक किंवा नगरपालिकेचा अजिबात हस्तक्षेप होणार नाही. ट्रस्टने पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे हा पार्क उभा करावा. शक्य आहे तोवर देखभाल करावी. त्यापुढील जबाबदारी पालिकेची राहील.’ सुरेश पोवार यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, वाचनालय समिती सभापती रश्मीराज देसाई, मनिषा जाधव-मोहिते, अमृत देसाई यांचीही भाषणे झाली. उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती अरुणा कोलते, नगरसेवक अमर मांगले, प्रा. बीना कुराडे, उदय जोशी, किरण कदम, प्रा. किसनराव कुराडे, राजेंद्र गड्यान्नावर, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. डी. व्ही. चव्हाण यांनी आभार मानले.

चौकट...
एकाधिकारशाहीला विरोधाचे उदाहरण...
श्रीपाद हळबे म्हणाले, ‘‘पालिकेत प्रशासक असताना तीन वर्षे अडकलेले काम लोकप्रतिनिधी आल्यानंतर चार महिन्यात झाले. हे लोकशाहीचे प्रतीक आणि एकाधिकारशाहीला विरोधाचे जातिवंत उदाहरण म्हणावे लागेल. ट्रस्टतर्फे दहा जूनच्या आत तारांगणही बसविले जाणार आहे. दुजाभाव न करता खेड्यातील शाळांनाही संधी द्यावी. दहा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली तरी पैसे फिटले असे समजेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com