गडहिंग्लज आठवडा बाजारभाव

गडहिंग्लज आठवडा बाजारभाव
Published on

42608
गडहिंग्लज : आठवडा बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------
लोगो ः गडहिंग्लज आठवडा बाजारभाव

बिन्सची डबल सेंच्युरी; भेंडी स्वस्त

आंब्याची अधिक आवक : पालेभाज्या, कोंथिबिरीचा तोरा कायम

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील भाजी मंडईत उन्हाळ्याच्या उष्म्याबरोबरच पालेभाज्या, कोंथिबिरीचा दर वाढू लागला आहे. दर चौपटीने वाढल्याने सर्वसामान्य बाजाराच्या पिशवीतून पालेभाज्या वगळू लागले आहेत. मागणीच्या तुलनेत जेमतेम आवक असल्याने बिन्सचा दराने डबल सेंच्युरी गाठली आहे. तुलनेत दोन महिने महागलेल्या भेंडीचा दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. फळबाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर पूर्वपदावर आल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींची तुरळक आवक असून, मागणी कमी झाली आहे.
पालेभाज्या, कोथिंबिरीच्या दराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुळात स्थानिक आवक नसल्याने लगतच्या सीमाभागातून येणाऱ्या आवकेवरच मंडई अंवलबून असल्याने दर चढे आहेत. मेथी, कोथिंबीर ३० ते ४० रुपये पेंडी असा दर आहे. पालेभाज्या महागल्याने ग्राहक तुलनेत दर उतरलेल्या कोबी, भेंडी, वांगी, दोडका खरेदीकडे वळला आहे. खासकरून भेंडी मुबलक झाल्याने किलोचा दर ४० रुपयांवर आला आहे. बिन्सचा दर २०० रुपये किलो असा कडाडला आहे. हिरव्या वाटाण्याचा हंगाम संपत आल्याने कमी आवक होऊन किलोचा दर १५० रुपयांवर पोहोचला आहे.
कांदा, बटाट्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. कांदा १५ ते २५, तर बटाटा २० ते ३५ रुपये किलो आहेत. लसणाची मागणी टिकून असून, ८० ते २०० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार भाव आहे. महागलेल्या आल्याचे दर टिकून आहेत. फळबाजारात कोकणातील हापूसची आवक वाढल्याने दर पूर्वपदावर आले आहेत. आकारानुसार ३५० ते ५०० रुपयांपर्यंत डझनाचा दर आहे. स्थानिक आवकही सुरू झाली आहे. चिकू, पेरूचा हंगाम संपल्याने आवक किरकोळ सुरू आहे. जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे म्हशींची केवळ ३० टक्के आवक असून, मागणी नसल्याने मंदी आहे.
...............................
चौकट...
संत्री महागले
फळबाजारालाही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. आंबा वगळता इतर सर्वच फळांची आवक ओसरली आहे. परदेशी सफरचंद, संत्री यांची आवक असली तर किलोचा दर २०० रुपयांवर गेला आहे. सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक कमी झाली आहे. किलोमागे २० रुपयांनी दर वाढून १२० रुपयांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com