गड संक्षिप्त

गड संक्षिप्त
Published on

42612
गडहिंग्लज ः शिंदे हायस्कूलतर्फे दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी एस. के. डोंगरे व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
-------------------------------------
शिंदे हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
गडहिंग्लज ः येथील वि. दि. शिंदे हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रणव पाटीलने ९९.६० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तृतीय, तर गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. प्रणया दळवीने ९७.२० टक्के मिळवत केंद्रात व शाळेत द्वितीय, तर समीक्षा खोतने ९६ टक्के गुण मिळवून केंद्रात व शाळेत तृतीय क्रमांक मिळविला. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये प्रणाली शेवाळे, वरद भोसले, श्रेया पाटील, भक्ती पाटील, साई देसाई, गिरिजा हळवणकर, संचित पाटील, समर्थ रक्ताडे, श्रावणी पाटील, संस्कृती राणे, ऐश्वर्या देसाई, श्रेया कानडे, अधिराज चव्हाण, अथर्व सुतार, भक्ती सलवादे, वरद कुलकर्णी, स्वरूप शिंदे, दर्शन खोराटे, प्रणाली मुरुकटे, विराज पाटील, श्रीनिवास हालबागोळ, विभा शिंदे, समीक्षा पाटील, पल्लवी कुंभार व शिवम शेटके यांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापक एस. के. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
--------------------------------------
‘क्रिएटीव्ह’ची शंभर टक्क्यांची परंपरा
गडहिंग्लज ः येथील क्रिएटिव्ह हायस्कूलने दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची २४ वर्षांची परंपरा यंदाही कायम राखली. शुभम देसाई ९६.४०, अर्णवी सौंदत्ते ९५.६०, वरदा पोटे-पाटील ९४.८०, कृतिका पाटील ९४.६०, श्रावणी मांडेकर ९४.६० या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश मिळविले. ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर यांचे प्रोत्साहन, तर संभाजी सावंत, अण्णासाहेब घेवडे, स्नेहा पारधे, निवेदिता पाटील, नासीर शेख यांचे मार्गदर्शन केले.
---------------------------------------
अनुष्का पोटे आजरा तालुक्यात प्रथम
उत्तूर ः दहावीच्या परीक्षेत येथील पार्वती-शंकर विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का पोटे हिने ९८.२० टक्के गुण मिळवून आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे ः आदित्य आळवे (९६.८०), अथर्व भाटले (९६.२०), गौरी भिऊंगडे, ओम सुतार (९६). अनुष्का, आदित्य, अथर्व, गौरी यांनी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळविले.
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com