

42613
गडहिंग्लज ः वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वृत्तपत्र कल्याणकारी योजनेची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन काशीनाथ गडकरी यांनी प्रकाश आबिटकर यांना दिले.
----------------------------------------
वृत्तपत्र कल्याणकारी
योजनेत लक्ष घालावे
शिंदे शिवसेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० ः काही महिन्यांपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजना मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु अद्याप योजनेची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या योजनेत लक्ष घालून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
याबाबत आबिटकर यांना शिवसेनेचे शहर संघटक काशीनाथ गडकरी, निखिल सुतार, सागर कांबळे यांच्या शिष्टमंडलाने निवेदन देऊन लक्ष वेधले. रोज पहाटे वृत्तपत्र विक्रेते जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या घराघरांत पोहोचवत असतात. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे हे काम करत असतात. राज्यातील वृत्तपत्र संघटना कित्येक वर्षांपासून मोर्चे, आंदोलने, निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहेत. आमदार असताना आपणही अधिवेशनामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला; परंतु अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आपण स्वतः या योजनेच्या कार्यवाहीत लक्ष घालून विक्रेत्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.