

42637
गडहिंग्लज : महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्रा. सदानंद वाली, प्रा. शंकर खाडे आदी.
------------------------------
राज्यात योग आयोग स्थापन करा
योग शिक्षक संघाची मागणी : मंत्री मुश्रीफ यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : ‘राज्यात योगशास्त्राचा प्रचार, प्रसार आणि विकास उत्तमरीत्या सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन केल्या आहेत. हजारो योग शिक्षक महाराष्ट्र योग शिक्षक संघाशी जोडले गेले आहेत. योग शिक्षक आणि योग विषयाला योग्य न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करा,’ अशी मागणी महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे केली आहे. याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
योग हा केवळ व्यायाम नसून तो आरोग्य, मानसिक संतुलन आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योगामुळे समाजाबरोबरच राष्ट्र सुदृढ होण्यास मदत मिळणार असल्याने राज्य शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर महाराष्ट्रात योग आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
योग शिक्षक संघटनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. सदानंद वाली, कोल्हापूर जिल्हा योगशिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शंकर खाडे यांनी हे निवेदन दिले. निवेदनावर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, डॉ. कुणाल महाजन, संतोष खरटमोल, सुपर्णा पाल, अरविंद कित्तूरकर, अरविंद सावळगी, प्रा. गुरुलिंग खंदारे, विठ्ठल मोरे, संपत सावंत यांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.