दहावी निकाल संक्षिप्त

दहावी निकाल संक्षिप्त
Published on

43001
गडहिंग्लज ः साधना प्रशालेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी अरविंद बारदेस्कर, आय. पी. कुटिन्हो, दिलीप आडसुळे, रिक्सन रॉड्रिग्ज, शीतल हरळीकर आदी.

‘साधना’मध्ये गुणवंतांचा विद्यार्थी सत्कार
गडहिंग्लज ः येथील साधना प्रशालेत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर होते. प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी स्वागत केले. अनन्या शिंदे हिने ९६.४० टक्के, वैष्णवी विजय देसाईने ९३.४०, ऋतुजा निकमने ९३.००, वैष्णवी रक्ताडेने ९०.४०, अल्फोन्सा बारदेस्करने ८९.६० टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकाविले. प्रशालेने शंभर टक्के निकालाची परंपरा जपली. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रशालेमार्फत सत्कार झाला. वर्गशिक्षक दिलीप अडसुळे, रिक्सन रॉड्रिग्ज, शीतल हरळीकर यांचाही विशेष सत्कार झाला.
..............................
रोझरीचा दहावीचा निकाल शंभर टक्के
आजरा ः येथील रोजरी इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सलग पंचवीस वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेतील सर्वच ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ३१ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता मिळवली आहे. तसेच २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राजवर्धन संदीप पाटीलने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम, तर आजरा केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला. रवित केसरकरने ९५.६० टक्के, माहीन शेखने ९४.८० टक्के, प्रियानी गुंजाटीने ९४.२० टक्के, मंजिरी तावडेने ९३.६० टक्के गुण मिळविले.
...........................
चिमणे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
उत्तूर ः चिमणे (ता. आजरा) येथील कर्मवीर विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. सई पाटीलने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी खाडे (८७.६०) द्वितीय, तर श्रेया बोरवडकर (८५) तृतीय आली.
....................
शर्वरी पाटील आजरा तालुक्यात प्रथम
उत्तूर ः येथील उत्तूर विद्यालयाची विद्यार्थिनी शर्वरी पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९८.२० गुण मिळवून आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे ः सृष्टी आपके (९३.८०), अंकिता गायकवाड( ९३).
...........
घोरपडे हायस्कूलचा निकाल ९१.५२ टक्के
नूल ः हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९१.५२ टक्के लागला. आर्या जगताप व सपना नवलगुंदे यांनी ८९.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मुग्धा रानमाळेने ८६.२० टक्के, तर सोनाली मानेने ८५.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com