गावच्या विकासात योगदान द्या

गावच्या विकासात योगदान द्या
Published on

43079
पेरणोली ः येथे वनश्री देसाई यांचा सत्कार करताना सर्जेराव देसाई. यावेळी उपस्थित संकेत सावंत, ग्रामपंचायत सदस्य आदी.
---------------------------
गावच्या विकासात योगदान द्या

वनश्री देसाई ः पेरणोली ग्रामपंचायतीत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ ः ‘गट-तट विसरून सर्वांनी गावच्या विकासात योगदान द्यावे. राजकारणापलीकडे गावचा विकास महत्त्वाचा आहे. रस्ते, गटर्स, पाणंद रस्ते, पिण्याचे पाणी यासह शाश्वत विकासासाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे,’ असे प्रतिपादन पेरणोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वनश्री देसाई यानी केले.
पेरणोली ग्रामपंचायतीत सरपंच वनश्री देसाई यांचा कार्यालयीन प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. उपसरपंच संकेत सावंत, राजेंद्र सावंत, तानाजी देसाई, सर्जेराव देसाई, संतोष जाधव, सुभाष देसाई, रणजित फगरे, संदीप नावलकर, रूपाली पाईम, सुषमा मोहिते, सुनीता कालेकर, दिनेश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. ग्रामसेविका अमिषा देवर्डेकर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सरपंच देसाई यांचा सत्कार झाला.
सुभाष देसाई म्हणाले, ‘पेरणोलीचा तालुक्यात दबदबा आहे. गावातील अनेकानी तालुकास्तरावर नेतृत्व केले आहे. गावात विकासकामे सुरू आहेत; पण अजूनही पाणंद रस्ते व अन्य विकासकामे शिल्लक आहेत. त्याबाबत प्रयत्न करावेत.’ तानाजी देसाई म्हणाले, ‘निवडणुकीपुरते राजकारण असते. निवडणुकीनंतर ते विसरून जावे. गावात विविध प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी आणूया.’
हरिभाऊ कांबळे यांचेही भाषण झाले. काकासाहेब देसाई, उतम देसाई, दीपक देसाई, सुरेश कालेकर, रमेश कालेकर, ज्ञानोबा सासूलकर, विष्णू दारुडकर, दीपक लोखंडे, शंकर लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
..............
चाैकट...
हिवरे बाजारच्या धर्तीवर विकास करा
राजकारणातून गावचा विकास कधीच साधला जात नाही. गावचा शाश्वत विकास झाला पाहिजे. हिवरे बाजारप्रमाणे गावचा विकास झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी संकल्प करून प्रयत्न करूया, असे दर्शना देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com