‘रवळनाथ’च्या चंदगड शाखेचा २० वा वर्धापनदिन उत्साहात

‘रवळनाथ’च्या चंदगड शाखेचा २० वा वर्धापनदिन उत्साहात
Published on

45616
चंदगड : रवळनाथ शाखा वर्धापनदिनानिमित्त रवळनाथ प्रतिमेच्या पूजनप्रसंगी ॲड. राजाराम बांदिवडेकर, एम. एल. चौगुले, डॉ. आर. एस. निळपणकर, पुष्पा नेसरीकर आदी उपस्थित होते.

‘रवळनाथ’च्या चंदगड शाखेचा
२० वा वर्धापनदिन उत्साहात
गडहिंग्लज, ता. २४ : श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या चंदगड शाखेचा २० वर्धापन दिन व ग्राहक मेळावा उत्साहात झाला. संस्थेचे सभासद ॲड. राजाराम बांदिवडेकर यांच्या हस्ते श्री रवळनाथाच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थापक, अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौगुले म्हणाले, ‘‘सभासद, ठेवीदार, कर्जदार व सल्लागार मंडळाच्या विश्वासामुळे रवळनाथच्या चंदगड शाखेकडे २५ कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेच्या शाखांमधून मोबाईल बॅंकिंग, सीबीएससह डिजिटल सेवा दिली जाते.’’ ॲड. बांदिवडेकर यांच्यासह विठ्ठल गावडे यांचा सत्कार करण्यात आला. कै. पुष्पा सुतार यांचे वारस पती हरिबा सुतार यांना सभासद कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली. यावेळी सुरेश शिरोडकर, डॉ. सोनाप्पा गोरल, डॉ. केदारी निकम, डॉ. आप्पासाहेब कांबळे, मारुती घुरे, कृष्णकांत पिलारे, सुधा नेसरीकर, पूर्वा नेसरीकर, राहुल तोडकर, शंकर वाली, डॉ. अरुण जाधव, रत्नहार पाटील, मनोहर गडकरी, शाखाधिकारी किरण कोडोली उपस्थित होते. शाखाध्यक्ष पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत केले. सल्लागार डॉ. आर. एन. साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश घोरपडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com