योग दिन एकत्र

योग दिन एकत्र
Published on

मिलिंद हायस्कूल
शाहूनगरातील मिलिंद हायस्कूलमध्ये योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मुख्याध्यापक मधुकर शिर्के, एम. एन. दिंडे, जे. जी. कदम आदी उपस्थित होते.
---------------
विद्यापीठ हायस्कूल
येथील विद्यापीठ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केली. क्रीडा शिक्षक आर. व्ही. रोकडे, जिमखाना प्रमुख ए. डी. चव्हाण यांनी योगासनाचे महत्त्व विषद केले. यावेळी मुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, आर. टी. गुरव, उपप्राचार्या के. व्ही. भानुसे, एम. व्ही. कुंभार, एन. ए. ढगे, आदी उपस्थित होते.
---------------
कळंबा गर्ल्स हायस्कूल
कळंबा तर्फ ठाणे येथील कळंबा गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी विविध प्रात्यक्षिके मार्गदर्शनासह सादर केली. योग व प्राणायमाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मुख्याध्यापिका टी. बी. वस्रद, एन. एस. पाटील, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
निरंकारी मिशनचा योग दिवस
संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये योग आणि आध्यात्मिक जागृतीवर भर देणारे कार्यक्रम झाले. याप्रसंगी कोल्हापूरचे झोनल प्रभारी अमरलाल निरंकारी यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा, अन्य उपस्थित होते.
---------------
विद्यापीठ मराठी शाखा
विद्यापीठ मराठी शाखेमध्ये विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मस्कर यांनी ​मार्गदर्शन केले.​ पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिकमध्ये सहभाग घेतला. शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
आई सर्व्हिस सेंटर
आई सर्व्हिस सेंटरमध्ये पेट्रोल पंप डीलर डॉ​. विनोदकुमार वाघ यांनी मार्गदर्शन केले. योगशिक्षक डॉ​. देवेंद्र रासकर​, रामचंद्र सोनार, नीलिमा नवांगुळे​ यांनी प्रात्यक्षिके करून घेतली.
---------------
नेहरू विद्यालय
महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या​ नेहरू विद्यालयामध्ये मयुरा गोखले​ यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका रजनी कोळी​, शोभा शिंत्रे, मनीषा खोचगे​, राधिका कोळेकर​ व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
‘गोकुळ’मध्ये विविध उपक्रम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे आणि डॉ. चंद्रकांत परूळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती​. योग प्रशिक्षक संजय पोवार यांनी ​मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ​डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, हणमंत पाटील, दत्तात्रय वागरे, बाजीराव राणे, दीपक पाटील, अशोक पुणेकर, आर. बी. पाटील, मानसिंग देशमुख, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
---------------
​सणगर तालीम मंडळ
मंगळवार ​पेठेतील सनगर तालीम ​मंडळामध्ये सूर्यकांत गायकवाड ​यांनी प्रात्यक्षिके सादर केली. नगरसेविका नीलांबरी साळोखे, साधक, नागरिक उपस्थित होते.
----------------
बालाजी योग वर्ग
बालाजी मोफत योग वर्गातर्फे स्वराज्य तरुण मांडळ येथे योग दिन ​साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षिका सविता पोतदार यांनी ​प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी नगरसेविका मानसी लोळगे, इंद्रजित पावले​, रवींद्र मेस्त्री​, संध्या पवार​-मेढे, जयश्री मोळे, मंगल पाटील, राधा मेस्त्री, मीना पाटील, सविता परब, संध्या कटके, मीनाक्षी मोरे, सुचित्रा चौगुले, सुनंदा पाटील, ज्योती थोरात, विद्या सुतार, साक्षी चौगुले​ उपस्थित होते.
------------------
​संभाजीनगर परिसर
योग हीच निरोगी आणि समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली ​असल्याचे मत शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ​व्यक्त केले.​ संभाजीनगर परिसरात​ योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.​ किरण नकाते व नगरसेविका माधुरी नकाते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.​ योग प्रशिक्षिका उज्ज्वला डाफळे यांनी प्रात्यक्षिके सादर​ केली. अनिल शिंदे, मिलिंद पोर्लेकर, भीमराव पाटील, सचिन मगदूम, अमर नकाते उपस्थित होते.
---------------
ऑक्सिजन पार्क​
ऑक्सिजन पार्कमध्ये मोफत योग प्रशिक्षण वर्गातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रताप घेवडे​, ​चंद्रकांत झिरकांडे यांनी ​मार्गदर्शन केले. ​यावेळी भारती जाधव​, सुनीता मोहिते​, जयवंत पाटील​, मारुती बागल​, सचिन खराडे​, दीपक ढगाले ​यांच्यासह १३० हून अधिक ​सदस्य उपस्थित होते.
-------------------------
कोपार्डेकर शाळा समूह
श्रीमती आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूल व विद्यामंदिर शाहूपुरी, बालोद्यान यांच्यातर्फे आयेजित कार्यक्रमात पतंजली योगपीठ यांच्यामार्फत मनीषा जाधव, सुजाता अतिवाडकर, दीपिका तांबेकर व सुनीता शिपेकर यांनी ​मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मिलिंद कोपार्डेकर​, मुख्याध्यापक शंकर पाटील, वंदना पाटील, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते​.
------------------
स्वामी समर्थ योग केंद्र
फिनिक्स फाउंडेशन आणि स्वामी समर्थ योगा फिटनेस यांच्यातर्फे रुईकर कॉलनी येथे योगशिक्षक शमुवेल सौंदडे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमास ​नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
----------------
कोरगावकर हायस्कूल
कोरगावकर हायस्कूलमध्ये प्रशिक्षक सदाशिव हाटवळ​, इंद्रायणी पाटील ​व सुरेखा पोवार यांनी प्रात्यक्षिके सादर केली.​ यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे, बाबासाहेब डोणे, राजेंद्र कुंभार, हेमलता पाटील उपस्थित होते.
-----------------------
नूतन मराठी विद्यालय
नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये योगशिक्षिका पल्लवी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ओजस हेबाळकर, धनंजय शिरोळीकर, ईश्‍वरी काजरेकर व गार्गी देसाई या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक धनंजय बेदरे, रश्मी भागवत, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

राजे संभाजी योग वर्ग
साने गुरुजी वसाहत ः जागतिक योग दिनाच्या निमित्ताने देवकर पाणंद येथील राजे संभाजी योग वर्गातर्फे योगाची माहिती व योगाचे महत्त्व या विषयी वर्षा शिंदे, नितीन पाटणकर, रेश्मा पाटणेकर यांनी मार्गदर्शन केले. वर्षा पाटील, सुप्रीती काकडे, साक्षी पाटणकर, शारदा जाधव, दीपाली ढवळे, सीमा पाटील उपस्थित होते.

वारनुळ शाळा
बाजारभोगाव ः वारनूळ शाळेत योग दिन साजरा झाला. मुख्याध्यापक किरण सुतार यांनी योगाचे महत्त्व व आरोग्यदायी फायदे सांगितले. योग प्रार्थनेनंतर उत्तेजक हालचाली व विविध योगासने घेतली. जीवन माळवी, रमेश मेडेवाड व रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसने, प्राणायम केली.

बाजारभोगाव परिसर
बाजारभोगाव ः बाजारभोगाव, काळजवडे व पोहाळे तर्फ बोरगाव केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांत योग दिन उत्साहात साजरा झाला. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. नियोजन संबंधित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

बोरपाडळे परिसर
बोरपाडळे : बोरपाडळेसह परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्राणायाम व योगासने घेण्यात आली. बोरपाडळेसह शहापूर, आंबवडे, मिठारवाडी, दाणेवाडी, निकमवाडी, राक्षी, काखे, मोहरे आदी शाळामध्ये विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. काही ठिकाणी पालकांनी भाग घेतल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com