ऑनलाईन खत बुकींग स्थगित करा

ऑनलाईन खत बुकींग स्थगित करा
Published on

45869
गडहिंग्लज : भारतीय किसान संघातर्फे एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बाळगोंडा पाटील, अमरनाथ घुगरी, गुरुराज हत्ती, सचिन जाधव, सुनील कराळे उपस्थित होते.

ऑनलाईन खत बुकिंग स्थगित करा
भारतीय किसान संघ; शेतकऱ्यांत पुरेशी जनजागृती करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणासाठी ऑनलाईन बुकिंग ॲप सुरू केले आहे. मात्र, यात अनेक अडचणी येत आहेत. खतांचे लिंकिंग, काळाबाजात थांबविण्यासाठी शासनाचा हा निर्णय चांगला असला, तरी सदरची पद्धत तूर्त स्थगित करावी. शेतकऱ्यांत जनजागृती करुन रब्बी हंगामापूर्वी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही. ॲप वापराचे प्रशिक्षण दिलेले नाही. सर्व्हर डाऊन असतो. ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रश्‍न आहे. ओटीपीसाठी तासनतास दुकानात थांबावे लागते. एकाच कृषी सेवा केंद्रात सर्व खते उपलब्ध नसल्याने अनेक दुकाने फिरावी लागतात. पिकनिहाय गरजेनुसार कोटा मंजूर नाही. ऑनलाईन पेमेंटची सक्ती असल्याने उधारीवर बंधन आले आहे. अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग ॲप तूर्त स्थगित करावे.
प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी निवेदन स्वीकारले. प्रांत महामंत्री मदन देशपांडे, जिल्हाध्यक्ष बाळगोंडा पाटील, जिल्हा मंत्री सचिन जाधव, तालुकाध्यक्ष गुरुराज हत्ती, सुनील कराळे, अमरनाथ घुगरी, उमाशंकर मोहिते, मलगोंडा पाटील, के. डी. पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com