

45913
गडहिंग्लज : निखिल जोशी यांचा सत्कार डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते झाला. यावेळी बिनादेवी कुराडे, डॉ. एस. एम. कदम, सुरेश पोवार आदी उपस्थित होते.
शिवराजमध्ये निखिल जोशी यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा विद्यार्थी निखिल जोशी याने सी. ए. परीक्षेत यश मिळविले. या बद्दल महाविद्यालयातर्फे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे व सुरेश पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कुराडे मनोगत व्यक्त केले. डॉ. एम. डी. चौगुले यांनी स्वागत केले. निखिलने कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. ए. एम. हसुरे, डॉ. अशोक मोरमारे, प्रा. आशा पाटील, प्रा. बियामा वाटंगी, प्रा. अनिता पोवार आदी उपस्थित होते. डॉ. डी. पी. खेडकर यांनी आभार मानले.
----------------------
45914
हरळी : सिंबायोसिस स्कूलमध्ये झालेल्या लाईव्ह इंग्लिश उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी.
सिंबायोसिसमध्ये ‘लाईव्ह इंग्लिश’ उपक्रम
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे व्यवहारज्ञान मिळावे व दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव यावा या उद्देशाने ‘लाईव्ह इंग्लिश’ हा ग्रंथालय सदस्यत्व व पुस्तक देवाण-घेवाण प्रक्रियेचा अनुभव देणारा हा अभिनव उपक्रम उत्साहात झाला. मुख्याध्यापिका कविता कागिनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. शिक्षक राजेंद्र शेलार, तुकाराम पालकर, अशोक पाटील, छाया वाघराळकर, प्रियांका पवार, मीनाक्षी कुराडे, अलका कानडे, दिगंबर पाटील, अतुल अहिरे यांच्या सहकार्यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.