

46257
बड्याचीवाडी : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रीतम कापसे, कुमार पाटील, संदीप कुरळे, सुदर्शन चव्हाण, बाजीराव खोत आदी उपस्थित होते.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींना अभिवादन
गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेमध्ये भाजप गडहिंग्लज मंडलतर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन केले. बाजीराव खोत यांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांनी राष्ट्राच्या अखंडतेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण म्हणून २३ जून हा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले.
सुदर्शन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण झाले. संदीप कुरळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार, अनिल खोत, विश्वनाथ खोत, सचिन घुगरे, शैलेंद्र कावणेकर, डॉ. वृषभ कासार, संजय कुलकर्णी, विशाल नेवडे, अझर बोजगर, प्रशांत कोळी, भिकाजी पाटील उपस्थित होते. कुमार पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.