...अन्यथा भजन करत आंदोलन

...अन्यथा भजन करत आंदोलन
Published on

06356
आजरा : आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन देताना नगरसेवक परशराम बामणे. यावेळी अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी.

...अन्यथा भजन करत आंदोलन
अन्याय निवारण समितीचा इशारा; आजरा नगरपंचायतीला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ : आजऱ्यातील प्रभाग क्र. १५ व ११ मधील विविध नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित कामाबाबत तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा येत्या (ता. २१) भजन करत, ढोल ताशासह आंदोलन करू, असा इशारा सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणित अन्याय निवारण समितीने दिला. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा व प्रश्‍नांबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही नगरपंचायत प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाई-भाई टॉकीज ते शिवकॉलनी तसेच चाफे गल्ली ते सरकारी दवाखाना या मार्गांवरील खड्डे बुजवण्याची गरज आहे. मंजिरी परिसरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट पुन्हा सुरू करणे, चराटी कॉलनी, आपटे कॉलनी येथील मुख्य पाणीपुरवठा लाईन बदलणे, नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, विविध भागांत नवीन स्ट्रीट लाईट व सोलर लाईट बसविणे, रुक्मिणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करणे, चर्च गल्लीतील विहिरीजवळील पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रामदेव गल्लीतील रामाची विहीर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करणे, विरंगुळा केंद्रासाठी मंजूर केलेले दोन गाळे उपलब्ध करून देणे, जोशी गल्लीतील मंजूर रस्त्याचो प्रत्यक्ष काम सुरू करणे अशा मागण्या आहेत. याची कार्यवाही तातडीने न झाल्यास मंगळवारी (ता.२१) आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने भजन व ढोल-ताशा वाद्यांच्या गजरात आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर नगरसेवक तथा समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. स्मिता कुभांर, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, संजय जोशी, जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोझा, रामचंद्र पंडित, संतोष बांदिवडेकर, अभिजित परीट यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com