

पॉलिटेक्निकची चौथी यादी जाहीर
प्रवेशाची आज अखेरची मुदत; सोमवारपासून समुपदेशन फेरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची शेवटची चौथी यादी जाहीर झाली आहे. या विद्यार्थ्यांना उद्या (ता. ८) प्रवेश घेण्याची अखेर मुदत आहे. या फेरीत जागा रिक्त राहिल्यास संबंधित संस्थास्तरावर सोमवार (ता. १०) पासून समुपदेशन फेरी होणार आहे.
पॉलिटेक्निची प्रवेशप्रकिया २० मेपासून सुरू झाली. यंदा एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अधिक चढाओढ झाली. परिणामी, पहिल्या तीन फेऱ्यांतही अनेकांना पसंतीचे अभ्यासक्रम आणि संस्था न मिळाल्याने अनेकांनी बेटरमेंटचा पर्याय स्वीकारून प्रतीक्षा केली. त्यामुळेच चौथ्या यादीकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची चौथी यादी गुरुवारी (ता. ६) सायंकाळी संकेतसस्थळावर जाहीर झाली. चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प सक्तीचे राहणार आहेत. त्यामुळे यादीत नाव लागलेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे आणि शुल्क घेऊन संबंधित संस्थेत उद्या प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीनंतरही काही जागा रिक्त राहिल्यास संस्थास्तरावर समुपदेशन फेरी होणार आहे. सोमवारपासून संबंधित संस्थेत ही कार्यवाही होणार आहे.
................
चौकट...
बुधवारपर्यंत शुल्क परत
समुपदेशन फेरी संस्थास्तरावर होणार आहे. या फेरीचे वेळापत्रक संबंधित संस्था जाहीर करेल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहून या समुपदेशन फेरीत सहभागी होता येईल. यात बुधवार (ता. १२) अखेर प्रवेश रद्द केल्यास भरलेले शुल्क परत मिळणार आहे. १४ ऑगस्ट प्रवेश प्रक्रियेची शेवटची मुदत राहणार आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.