गड- संक्षिप्त

गड- संक्षिप्त
Published on

56205
दुंडगे : परिश्रम विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सदानंद वाली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

परिश्रम विद्यालयात पारितोषिक वितरण
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील परिश्रम विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. माजी प्राचार्य सदानंद वाली यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दहावीतील गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आर. जी. कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. सध्याच्या परिस्थितीत केवळ गांधी विचारच जगाला तारू शकतात, असे मत वाली यांनी व्यक्त केले. आर. एस. चौगुले, राधिका जाधव, आर. बी. सुतार, अविनाश कुलकर्णी, ॲड. संजय देसाई, तमान्ना पाटील, मुख्याध्यापक डी. जी. दिवटे यांचीही भाषणे झाली. संस्थेचे उपाध्यक्ष बी. ए. संकपाळ, संचालक एन. एस. पाटील, ए. बी. बागे, जी. एम. कोरी, बी. जी. मोकाशी, दत्ता मगदूम, सुरेश गुलगुंजी, सचिन ओहरा, उदय तेलवेकर, राधाबाई दांडगीदास, सोमगोंडा चिनगोंडा, डॉ. सुरेश संकेश्‍वरी उपस्थित होते. बी. एम. मगदूम यांनी प्रास्ताविक केले. राहुल नूली यांनी सूत्रसंचालन केले. गणेश खरात यांनी आभार मानले.
--------------------
56207
नूल : न्यू इंग्लिश स्कूलतर्फे बक्षीस वितरणप्रसंगी भिमाप्पा कोळी, गुरुप्रसाद गुरव, युवराज गायकवाड महेंद्र कानडे, रामगोंडा पाटील, विलास कुलकर्णी, श्रीशैलापा साखरे आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिशमध्ये नडगदल्लींना आदरांजली
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष ईश्वराप्पा नडगदल्ली यांची ३८ वी पुण्यतिथी व ऑगस्ट क्रांती दिन झाला. संस्थेचे सचिव रामगोंडा पाटील अध्यक्षस्थानी होते. नडगदल्ली यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन प्रकाश तेलवेकर, समाधी पूजन रामगोंडा पाटील, तर प्रतिमेचे पूजन विलास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. श्रावणी शेलार, साक्षी चौगुले, श्रद्धा पाटील या विद्यार्थिनींची भाषणे झाली. वक्तृत्व स्पर्धा, जीटीएस, एमपीएसपी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंतांना भिमाप्पा कोळी, गुरुप्रसाद गुरव, शेखर कडलगे, युवराज गायकवाड, महेंद्र कानडे, पर्यवेक्षिका विजया वंदाळे, संजय जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. प्राचार्य श्रीशैलाप्पा साखरे यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. व्ही. लगळी यांनी आभार मानले.
----------------------
56208
मुगळी ः महात्मा गांधी वाचनालयात रंगनाथन यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन झाले. यावेळी चंद्रकांत माने, श्रीपाद स्वामी, सुरेश पाटील, गुरगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
-------------------
56209
वडाळा ः भादवणच्या नामदेव मुळीक यांनी लिहिलेल्या ‘विठ्ठल भक्ती’ ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी वारकरी व मुळीक कुटुंबीय उपस्थित होते.

‘विठ्ठल भक्ती चरित्र’ ग्रंथाचे प्रकाशन
गडहिंग्लज ः भादवण (ता. आजरा) येथील नामदेव मुळीक यांनी लिहिलेल्या ‘विठ्ठल भक्ती’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील (मुंबई) विठ्ठल मंदिरामध्ये झाला. मुळीक यांनी विठ्ठल भक्ती व भागवतधर्म जोपासलेल्या वडिलांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग, त्यांचे कार्य, विठ्ठल भक्ती नामाचे महत्त्व आदींचे महत्त्व विषद करणारा दीड हजार पानांचा हा ग्रंथ लिहिला आहे. वडाळा परिसरातील वारकरी आणि मुळीक यांच्या उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी मुळीक कुटुंबीयांसह परिसरातील वारकरी मंडळी उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com