

56417
गडहिंग्लज : अरविंद चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविले. यावेळी हणमंत साठे, राजाराम कदम, तम्मा बोरगावे आदी उपस्थित होते.
चव्हाणांच्या स्मृतिदिनी विविध उपक्रम
गडहिंग्लज : नूल येथील अरविंद चव्हाण यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त निवासी मूकबधिर मुलामुलींना शैक्षणिक साहित्य व स्नेहभोजनाचा उपक्रम राबविला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हणमंत साठे, राजाराम कदम, कदम, तम्मा बोरगावे, सुभाष चौगुले, पुंडलिक पाटणे, रवी चौगुले, वैभव पाटील, विजय डांग, चन्नू भालेकर, विदान चव्हाण, विहान चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी वडील कै. अरविंद यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी मुकबधीर मुलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याची घोषणा केली.
----------------------
वंचित लाडक्या बहिणींना संधी द्या
गडहिंग्लज : राज्यातील अनेक पात्र लाडक्या बहिणी अजूनही लाभापासून वंचित आहेत. त्यांना ई-केवायसी करण्याची संधी द्यावी, अशी मागणी न्यू युवा मंचचे अध्यक्ष काशिनाथ गडकरी, सागर कांबळे व लक्ष्मण पाच्छापुरे यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी कार्यालयास निवेदन सादर केले आहे. गतवर्षी शासनाने ईकेवायसी पोर्टल सुरू केले. त्यावेळी महिलांनी केवासी केली. परंतु काही दिवसात दुरूस्तीसाठी पुन्हा नव्याने लिंक ओपन केली. त्याची माहिती खालीपर्यंत न पोहोचल्याने अनेक महिला केवायसीपासून वंचित राहिल्या. त्यामुळे पात्र महिलाही यातून बाहेर पडल्या. या महिला बालकल्याण समिती, बॅंक शाखा, ऑनलाईन सेंटरमध्ये संपर्क साधून केवायसीची विचारणा करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पुन्हा केवायसी करण्यासाठी अशा वंचित महिलांना संधी देण्याची मागणी आहे.
-------------------------
56418
हरळी : गोडसाखरतर्फे सुरेश व सुभाष मेवेकरी यांचा सत्कारप्रसंगी प्रकाश पताडे, प्रकाश चव्हाण, संचालक मंडळ, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
गोडसाखरतर्फे मेवेकरी बंधूंचा सत्कार
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) कॅन्टीन सुविधासाठी असलेले सुरेश व सुभाष मेवेकरी यांनी ४६ वर्षांच्या सेवेतून मुक्त झाल्याबद्दल अध्यक्ष प्रकाश पताडे व उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. संचालक सतीश पाटील म्हणाले, १९७९ पासून मेवेकरी बंधू कॅन्टीनच्या माध्यमातून सभासद, शेतकरी, वाहतूकदार, कंत्राटदार, संचालक, कर्मचाऱ्यांना प्रामाणिक व अल्प दरात अल्पोपहार, जेवण देण्याची सेवा दिली. कारखान्याच्या अडचणीतवेळीही कोणतीही अपेक्षा न करता त्यांनी सेवा पुरविली. सर्वांचा आदरातिथ्य करण्यात ते कमी पडले नाहीत. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक सुनील महिंद, सचिव शामराव हरळीकर, कर्मचारी व मेवेकरी कुटुंबीय उपस्थित होते.
------------------------
कौलगे शाळेत वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वराप्पाण्णा नडगदल्ली यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली. दोन गटांत ही स्पर्धा झाली. मुख्याध्यापक अण्णासाहेब सुतार यांच्या हस्ते झाले. गटनिहाय विजेते असे ः (लहान गट)- स्वरा दंडवते, प्रांजल केसरकर, भूमी ढेंगे. (मोठा गट)- युगंधरा येसरे, श्रेयस लोखंडे, सृष्टी वांगणेकर. रमेश चौगुले, नामदेव यादव, सुरेखा नंदनवाडे व बळीराम पाटील यांनी परिक्षण केले. विश्वजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांना अमृत देसाई यांच्यातर्फे प्रत्येकी एक हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.